Eknath Shinde yandex
महाराष्ट्र

Sangli Nagarpalika Election: शिंदेंनी भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला; सांगलीत ५५ वर्षानंतर सत्तांतर

Sangli Nagarpalika Election: सांगलीतील विटानगरमध्ये भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर विजय मिळवला आहे.

Siddhi Hande

सांगलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची एकहाती सत्ता

भाजपच्या ५५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला

२६ पैकी २२ जागांवर विजय

आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे. विटा नगरपरिषदेत सत्तांतर घडवले आहे. या संघात गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. माजी आमदार व भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या ५५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून काजल म्हेत्रे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.तर नगरसेवक पदाच्या निवडणूकीत 26 पैकी 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे.भाजपाला अवघ्या चार जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

विटा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशी तिरंगी लढत झाली होती. शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी शरद पवार गट,काँग्रेस ,शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा मिळाला होता. शिवसेना शिंदे गटाने विटा नगर परिषदेवर आपला भगवा फडकवला आहे. त्यामुळे जवळपास ५५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

सांगलीतील निवडणुकीचा निकाल

1 ) ईश्वरपूर नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय

2 ) आष्टा नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी

3 ) तासगाव नगरपरिषद स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी

4 ) पलूस नगरपरिषद काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी

5 ) विटा नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी

6 ) जत नगरपरिषद भाजपाचे रवींद्र आरळी विजयी.

7) आटपाडी नगरपंचायत भाजपाचे उत्तम जाधव विजयी

8 ) शिराळा नगरपंचायत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या शिवसेना उमेदवारानं मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप; पोलिसांशीही घातली हुज्जत

अंत्यविधीवरून परतताना काळाचा घाला; अपघातात एकाच कुटुंबातील ६ महिलांचा मृत्यू, मकरसंक्रातीच्या दिवशी गावावर शोककळा

मतदानाच्या आदल्या दिवशी कारमध्ये कोट्यवधी रुपये; भाजप-शिंदेसेनेत मध्यरात्री राडा

Maharashtra Live News Update: घणसोलीत भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

संक्रांतीचा सण ठरला शोकांत; ट्रक अपघातात दोन बहिणींचा दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT