स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

maharashtra election exit poll 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका पाहायला मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.

राज्यात आज शनिवारी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर या निवडणुकीचा एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार, भाजपचा डंका पाहायला मिळत आहे. भाजपनंतर शिंदे गट बाजी मारताना दिसत आहे. भाजपचे २३७०, शिंदे गट ९२७, राष्ट्रवादी अजित पवार गट ६३३ आणि शहर विकास आघाडीचे २२२ नगरसेवक निवडून येण्याचा अंदाज पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे

महत्वाचे -

२८८ नगरपरिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीचा हा अंदाज साम टीव्हीच्या महा एक्झिट पोलचा आहे. आम्ही मतदारांकडून फक्त कल जाणून घेतलाय. हा अंतिम निकाल नसून विजयी उमदेवाराची अधिकृत घोषणा २१ डिसेंबर रोजी आयोगाकडून करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com