

आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला
नगराध्यक्षपदी भाजपचे उत्तमराव जाधव विजयी
आटपाडीत पहिल्यांदाच नगरपंचायत निवडणूक पार पडली
या ठिकाणी तिरंगी लढत पार पडली होती.
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हाती लागला आहे. आटपाडी नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यास भाजपला यश मिळाले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उत्तमराव जाधव विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पहिल्यांदाच आटपाडी नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. याठिकाणी महायुतीमध्ये उभी फूट पडली होती. महायुतीमधील घटक पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली . नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. शिवसेनेने देखील याठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळाले आहे. भाजपाचे उमेदवार उत्तमराव जाधव हे विजयी झाले आहेत.
आटपाडी नगरपंचायत निवडणूक एकूण १७ जागांसाठी झाली होती. या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजपचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
दरम्यान, आटपाडी नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी देखील निवडणुकीच्या मैदानात होती. भाजपाकडून उत्तम जाधव यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सौरभ पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून रावसाहेब सागर हे मैदानात होते. या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख गट एकत्रित लढत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.