Siddhi Hande
आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषदेमध्ये फरक काय हे तुम्हाला माहितीये का?
नगरपंचायत ही ग्रामीण आणि शहरी संक्रण अवस्थेतील भागासाठी स्थापन करण्यात आली आहे. ज्या गावांचे अर्ध नागरी स्वरुप आहे तिथे नगरपंचायत असते.
नगरपंचायत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या १०,००० ते २५,००० असते. महानगरपालिकेपासून अंतर साधारण २०-२५ किलोमीटर असते.
येथे प्रभागानुसार उमेदवार निवडले जातात. ९ ते २० सदस्य निवडले जातात. यामधून अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी निवडले जातात. यांच्या कामकाजाचा कालावधी ५ वर्षांचा असतो.
नगरपरिषद ही पूर्ण शहरी भागासाठी असतात. या भागात लोकसंख्या १०,००० असते.
नगरपरिषदेमधून नगरसेवकाची निवड केली जाते. याचसोबत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवड केली जाते.
नगरपरिषदेचं स्वरुप पूर्णतः पूर्ण शहरी असते. नगरपंचायतीचे स्वरुप ग्रामीण आणि शहरी मिश्रित असते.