Government Holiday: मोठी बातमी! नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी या ठिकाणाची सार्वजनिक सुट्टी रद्द; कारण आलं समोर

Today Maharashtra Government Holiday Cancelled: आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी सुट्टी जाहीर केली होती. मात्र, आता काही मतदारसंघातील सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
Government Holiday
Government HolidaySaam Tv
Published On
Summary

आज नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी मतदान

निवडणुकीसाठीची सार्वजनिक सुट्टी रद्द

ज्या मतदारसंघातील निवडणुका रद्द तेथील सुट्टी रद्द

आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ज्या मतदारसंघात निवडणूक आहेत तिथे आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, आता ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामागचे कारणदेखील समोर आले आहेत.

Government Holiday
Government Holiday: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

२ डिसेंबरची सुट्टी रद्द (2nd December Today Holiday Cancelled)

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

या मतदारसंघातील सुट्ट्या रद्द (Holiday Cancelled Due To Nagarparishad and Nagarpalika Election)

यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

Government Holiday
Government Holiday: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

राज्यातील इतर मतदारसंघ म्हणजे जिथे आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत तिथे सुट्टी कायम आहे. फक्त ज्या मतदारसंघाच्या निवडणुका सध्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यांना सुट्ट्या मिळणार नाहीयेत.

Government Holiday
Government Holidays 2026: नवीन वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर; २०२६ मध्ये 'या' दिवशी सरकारी कार्यालये, बँका असणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com