Wardha Crime: जुगार अड्यावर पोलिसांची धाड, पण पुढे जे घडलं त्यानं वर्धा हादरलं

Violence Erupts in Wardha: वर्ध्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असता आरोपींनी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
Wardha police officers injured after sword attack during gambling den raid.
Wardha police officers injured after sword attack during gambling den raid.Saam Tv
Published On

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा येथून मोठी बातमी समोर आली आहे. वर्धा येथील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकल्याचे उघडकीस आले आहे. धाडीदरम्यान अड्ड्यावरील गुंडांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना वर्ध्याच्या सावंगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून धरपकड करायला सुरुवात केली आहे.

Wardha police officers injured after sword attack during gambling den raid.
Nashik Crime: १२ तास, २ खून, नाशिक हादरले; नागरिक दहशतीखाली, गुंडांचं पोलिसांनाच थेट आव्हान

मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सावंगी पोलिसांना गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापाळा रचून जुगार अड्ड्यावर धाड टाकत कारवाई केली. मात्र, तेवढ्यात आरोपी आणि त्यांच्या परिवाराने पोलिसांवर हल्ला केला.

Wardha police officers injured after sword attack during gambling den raid.
२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

तलवारीने वार करत पोलिसांना जखमी करण्यात आले. यामध्ये सावंगी पोलिसांचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झालीय. कारवाईसाठी सावंगी पोलिसांची टीम तेथे गेली असता पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेननंतर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत आरोपीच्या परिवारामधील महिलांचाही समावेश आहे.

Wardha police officers injured after sword attack during gambling den raid.
Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफा देण्याचे दाखवत २५ कोटींची फसवणूक; दीडशेहून अधिक नागरिकांनी केली गुंतवणूक

नवरात्रोत्सव सुरु असल्याने पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत सावंगी मेघे पोलीस स्टेशन हद्दीतील एका परिसरात जुगार अड्डा सुरु करण्यात आला होता. पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईने आरोपीचे पित्त खवळले आणि आरोपीसह त्यांच्या घरच्या महिलांनी थेट तलवारीने पोलिसांवर हल्ला चढवीला. यामध्ये दोन पोलिस गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांचे बंदोबस्त घटनास्थळी दाखल होत काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर काहींचा शोध सुरु आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे.

या घटनेतील मुख्य आरोपीसह एक आरोपी याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहे. या घटनेत आरोपीच्या घरच्या महिलांचा सुद्धा सहभाग आहे. पोलिसांनी प्रकरणात तलवार सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे. प्रकरणी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com