Maharashtra Nagarpalika Nagarparishad Election Results
Ajit Pawar group celebrates massive victory after securing mayor post and 17 seats in Ausa Municipal Council election.saamtv

Ausa Municipal Council Election: औसामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस 'बाजीगर'; काँग्रेससह भाजपला मोठा झटका, नगराध्यक्ष पद अजित पवारांकडेच

Maharashtra Nagarpalika Nagarparishad Election Results : औसा नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाने नगरध्यक्षासह २३ पैकी १७ जागा जिंकून वर्चस्व गाजवलंय. तर भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
Published on
Summary
  • औसा नगरपरिषदेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय झालाय.

  • एकूण २३ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारलीय.

  • परवीन शेख १३६१ मतांनी विजयी झाल्यात.

राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अनेक ठिकाणी भाजपनं जबरदस्त कामगिरी केली आहे. राज्यातील विविध विजयी नगसेवकांची यादी समोर येत आहे. यातील औसा नगरपरिषदेत अजित पवार गट 'दादा' ठरले.

Maharashtra Nagarpalika Nagarparishad Election Results
Local Body Election : विखे-पाटलांनी गड राखला! अहिल्यानगरच्या राहतामध्ये भाजपचा नगराध्यक्ष

येथे भाजपला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं धोबी पछाड दिलाय. २३ पैकी १७ नगरसेवक अजित पवार गटाचे निवडून आलेत. त्यासह नगराध्यक्षपदही राष्ट्रवादीकडे आलंय. तर भाजपच्या पारड्यात फक्त ६ जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन शेख या १३६१ मतांनी विजयी झाल्यात. दुसरीकडे काँग्रेसला साधं खातं ही उघडता आलं नाहीये. मागील वेळी काँग्रेसाला दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र त्यांना भोपळ्यावर समाधान मानावे लागले.

Maharashtra Nagarpalika Nagarparishad Election Results
Nagar palika election result LIVE : नाशिकमध्ये मोठा उलटफेर, अजित पवारांनी २५ वर्षांची सत्ता उलथवली, शिंदेंना जोरदार धक्का

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.

सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार विजयी

अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी

सासवड नगरपरिषद

प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी

सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे

प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी झालेत.

चंदगड नगरपंचायत

राजर्षी शाहू विकास आघाडीचे सहा उमेदवार विजयी

तर भाजप शिवसेना युतीचे तीन उमेदवार विजयी

पालघरमधील जव्हार नगरपरिषद

जव्हार नगरपरिषदेवर भाजपची आघाडी

नगरसेवकपदाचे भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी.

रहिमतपूर-

प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ५मध्ये ७ राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com