Nagar palika election result LIVE : नाशिकमध्ये मोठा उलटफेर, अजित पवारांनी २५ वर्षांची सत्ता उलथवली, शिंदेंना जोरदार धक्का

Ajit Pawar NCP victory in Nashik Bhagar : नाशिकमधील भगूर नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSaam Tv
Published On

Nashik Local Body Election News : नाशिकमधील भगूर नगर परिषदेत मोठा उलटफेर झाल्याचे दिसून आलेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भगूरमधील शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवली आहे. भगूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणक्यात सुरूवात केली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हा मोठा राजकीय उलटफेर मानला जातोय.

२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० पासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीच्या कलांमध्ये महायुतीचा विजय होत असल्याचे दिसतेय. महायुतीला १७८ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर ३५ जागांवर मविआ आघाडीवर आहे. राज्यात सर्वाधिक यश भाजपला मिळत असल्याचे दिसून येतेय. दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपद – ११

सध्या आघाडीवर

भाजप - ४

शिंदेंची शिवसेना - ५

अजित पवार राष्ट्रवादी - २

काँग्रेस -

ठाकरेंची शिवसेना -

शरद पवार राष्ट्रवादी -

इतर –

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Crime : बॉयफ्रेंडचं सैतानी कृत्य! शरीरसंबंध ठेवण्यासाठी कपडे काढायला लावले, कारमध्ये जे घडलं त्याने सगळेच हादरले

नाशिक जिल्ह्यात पहिल्या फेरीनंतर काय स्थिती ?

भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे आघाडीवर

पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर

सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले आघाडीवर

ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर

इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर

मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवर

सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Local Body Election Result : मतमोजणीआधीच 3 ठिकाणाचे निकाल समोर, ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

त्र्यंबकेश्वरमध्ये मतमोजणीचा पहिला राऊंड सुरू असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवाराकडून फटाक्याची आतिशबाजी गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आलाय. निकाल लागण्यापूर्वीच पहिली फेरी सुरू असताना जल्लोष केला. इगतपुरी नगरपरिषदेत दुसऱ्या फेरी अखेर शिवसेने शिंदे गटाच्या शालिनी खातळे 4059 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपच्या मधुमालती मेंद्रे पिछाडीवर आहेत.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Saam Maha Exit Poll : राज्यात भाजपच नंबर @1 ; राष्ट्रवादी, शिंदे सेनेला किती ठिकाणी सत्ता? ठाकरे-पवार गट, काँग्रेसची काय स्थिती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com