Saam Maha Exit Poll : राज्यात भाजपच नंबर @1 ; राष्ट्रवादी, शिंदे सेनेला किती ठिकाणी सत्ता? ठाकरे-पवार गट, काँग्रेसची काय स्थिती?

Maharashtra Municipal Elections Saam TV Exit Poll: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा महा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे. अधिकृत निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
Maharashtra Municipal Elections Saam TV Exit Poll
Maharashtra Municipal Elections Saam TV Exit PollSaam TV Exit Poll
Published On

Maharashtra local body elections exit poll 2025 : सात ते आठ वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषदा अन् ४२ नगर पंचायतींमध्ये मतदान पार पडले. ठाण्यातील बदलापूर, पुण्यातील बारामती अन् कोल्हापूर आणि नागपूरसह राज्यातील २८८ ठिकाणी निवडणुका पार पडल्या. २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. एकूण ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. पण त्याआधी साम टीव्हीने महा एक्झिटपोलमधून राज्यभरातील ठिकठिकाणचा कौल जाणून घेतलाय. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात भाजपने बाजी मारत असल्याचे त्यामध्ये दिसतेय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यभरात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील. २८८ पैकी भाजपचे १२२ इतके संभाव्य नगराध्यक्ष निवडून येतील असे दिसतेय.

२४६ नगर परिषदा अन् ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात आणि २० डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. २१ डिसेंबर रोजी आयोगाकडून अधिकृत निकाल जाहीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात कोण बाजी मारणार? राज्यात सर्वाधिक अध्यक्ष कुणाचे निवडून येणार? ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेंची शिवसेना आघाडी घेणार का? अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय असेल? काँग्रेसला किती जागा मिळतील, याबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. साम टीव्हीच्या महा एक्झिटपोलमध्ये कुणाची काय स्थिती? पाहूयात...

Maharashtra Municipal Elections Saam TV Exit Poll
Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा अंदाज साम टीव्हीच्या महासर्व्हेत दिसतेय. तर ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था बिकट असल्याचे चित्र यामधून दिसतेय. राज्यात सर्वाधिक नगरसेवक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मिळाले आहेत. ६८५९ पैकी भाजपचे तब्बल २३७० इतके नगरसेवक असतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Maharashtra Municipal Elections Saam TV Exit Poll
Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष -

भाजप - १२२

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ४२

राष्ट्रवादी (अजित पवार)- ३६

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- ०७

शिवसेना (ठाकरे) - १४

शहर विकास आघाडी - १०

इतर - १७

एकूण - २८८

कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक?

भाजप - २३७०

शिंदेसेना - ९२७

काँग्रेस - ७७३

राष्ट्रवादी (अजित पवार) ६३३

ठाकरेसेना - २५५

राष्ट्रवादी (शरद पवार गट) - १८७

इतर - १४९२

कोणत्या पक्षाची किती पालिकेत सत्ता

भाजप - १२२

शिंदेसेना - ४३

कॉंग्रेस - ३८

अजित पवारांची राष्ट्रवादी - ३२

श.वि. आ. - ८

शरद पवारांची राष्ट्रवादी - ०५

उद्धव ठाकरेंची शिवसेना - ०५

इतर - ३५

महत्वाचे -

२८८ नगरपरिषद अन् पंचायतीच्या निवडणुकीचा हा अंदाज साम टीव्हीच्या महा एक्झिट पोलचा आहे. आम्ही मतदारांकडून फक्त कल जाणून घेतला आहे. हा अंतिम निकाल नाही. विजयी उमदेवाराची अधिकृत घोषणा २१ डिसेंबर रोजी आयोगाकडून करण्यात येईल.

Maharashtra Municipal Elections Saam TV Exit Poll
Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com