Sangli  Saam Tv
महाराष्ट्र

रूग्णालयातून पळून घरी आला, दुसऱ्या दिवशी रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळला; सांगलीत नेमकं काय घडलं?

Sangli Tragedy: अमनचा मृतदेह रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत आढळला. डोक्यावरून रेल्वेचं चाक गेल्यानं ओळख पटणं अवघड झालं.

Bhagyashree Kamble

  • सांगलीत अमन आवळे (23) नावाच्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडलेला मृतदेह आढळला.

  • आजारी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत होता पण दोन दिवसांपूर्वी पळून घरी आला होता.

  • सकाळी घराबाहेर दुचाकीवर गेल्यानंतर काही तासांतच मृतदेह सापडला.

  • पोलिस तपास सुरू असून, आत्महत्या की हत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. तो काही दिवसांपासून आजारी होता. यामुळे तो रूग्णालयात उपचार घेत होता. दोन दिवसांपूर्वी तो रूग्णालयातून पळून घरी आला होता. नंतर दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. काही तासांत पोलिसांना त्याचा मृतदेह रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत आढळला. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.

अमन दीपक आवळे (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो माधवनगर रविवार पेठेतील अवचितनगर येथे कुटुंबासोबत राहत होता. तो आजारी असल्याने त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते. २ दिवसांपूर्वी तो रूग्णालयातून पळून घरी आला होता. रविवारी रात्री कुटुंबासोबत त्यानं जेवण केलं.

आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तो दुचाकी घेऊन घराबाहेर घडला. अवघ्या काही तासांत त्याचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशन परिसरात आढळला. रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.याची माहिती सांगली ग्रामिण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अमन याच्या डोक्यावरून रेल्वेचे चाक गेल्याने त्याची ओळख पटली नव्हती.पोलीसांनी त्याचे खिसे तपासले असता. एक आधार कार्डचे झेरॉक्स सापडले. यावरून त्याची ओळख पटली. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

ही दुर्दैवी घटना माधवनगरात पसरली असता मयत अमन आवळे यांच्या नातेवाईकांनी सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात एकच गर्दी करून आक्रोश केला. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Potato Bhaji: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा स्वादिष्ट आणि चविष्ट बटाट्याची सुकी भाजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नाशिक मुंबई महामार्गावर रायगडनगर जवळ खाजगी बसला भीषण अपघात

Dhananjay Munde: 'ते विधान मागे घ्या' बंजारा समाज भर सभेत धनंजय मुंडेंवर भडकले|VIDEO

Pune News : पुण्यातील रिगालिया रेसिडेन्सी सोसायटीच्या तत्कालीन समितीवर कारवाई; १३ सदस्य ५ वर्षांसाठी अपात्र

SIR : काही गडबड आढळली तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू; 'एसआयआर'बाबत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT