IND vs PAK मॅच फिक्सिंग होती, पराभवानंतर पाक संघावर पैशांचा पाऊस, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

India-Pakistan Match: भारताने आशिया चषक २०२५ सामन्यात पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यांनी सामना खेळणं हा देशद्रोह असल्याचं सांगून संजय राऊतांनी बीसीसीआय व भाजपवर गंभीर आरोप केले.
India-Pakistan Match
India-Pakistan MatchSaam
Published On
Summary
  • आशिया कप २०२५ सामन्यात भारताचा पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय.

  • सामना खेळू नये, अशा मागण्यांनंतर बीसीसीआयने दिला हिरवा कंदील.

  • संजय राऊत यांचा आरोप – सामना देशद्रोह व फिक्सिंगसारखा.

  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या सामन्यातून हजारो कोटींचा फायदा झाल्याचा दावा.

आशिया चषक २०२५मध्ये काल भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना दुबईत रंगला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यापूर्वी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत–पाक सामना खेळवू नये, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली होती. शिवसेना ठाकरे गटानेही याला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, बीसीसीआयनं या सामन्याला हिरवा कंदील दाखवल्यानंतर, हा सामना दुबईत रंगला. भारतानं विजय मिळवला. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गंभीर आरोप केले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हजार कोटी मिळाले

भारत - पाक सामन्यावर संजय राऊत म्हणाले, 'पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. कालच्या भारतविरूद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारतला घवघवीत यश मिळालं. पण यातून २५ महिलांचे पुसलेले कुंकू परत आले का? यातून काही भरपाई झाली का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

India-Pakistan Match
Pune: घर ते मेट्रो स्थानक प्रवास होणार मोफत; शटल बससेवा सुरू, थांबे अन् कोणत्या वेळेत धावणार?

'पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माघार घेतली 'असंही राऊत म्हणाले. 'क्रिकेटच्या मैदानावर रंगली ती फिक्सिंग मॅच होती. कालच्या मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. साधारण २५ हजार कोटी रूपये पाकिस्तानला पाठवण्यात आले. हाच पैसा आपल्याविरोधात वापरला जाईल', असा घणाघात राऊतांनी केला.

India-Pakistan Match
डोक्यात मोठा दगड पडला, जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला; माळशेज घाटात तरूणाचा मृत्यू

'कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फायदा झाला. तुम्ही पाकिस्तानला आमच्याविरुद्ध लढण्यासाठी महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात. अशा सामन्यावर आम्ही थुंकतो', असा हल्लाबोल राऊतांनी केला. 'एका खेळावर तुम्ही बहिष्कार टाकू शकले नाहीत', असंही राऊत म्हणाले.

India-Pakistan Match
मुंबईकरांचे मेगाहाल! पश्चिम, मध्य अन् हार्बर लोकलला लेटमार्क, रस्त्यावरही वाहतूककोंडी, मोनो रेल विस्कळीत

सुनील गावस्करच्या विधानावर राऊत म्हणाले, 'काल सुनील गावस्कर म्हणाले भारतीय संघाची खेळाची इच्छा नसली तरी संघाला खेळण्यासाठी भाग पाडले आहे. सरकारने जर खेळायला परवानगी दिली नसती तर, भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता, असं माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com