Sangli news Saam tv
महाराष्ट्र

Warna River : आंघोळीसाठी नदीत उतरला पण बाहेर आलाच नाही; वारणा नदीत बुडून तरुण बेपत्ता

Sangli news : पर्यटनासाठी चांदोली परिसरात आले होते. येथील उखळू पुलाजवळ त्यांनी पार्टी केली. त्यानंतर अभिषेकसह काही युवक हे जवळच असलेल्या वारणा नदीमध्ये आंघोळी करण्यासाठी उतरले

विजय पाटील

सांगली : सुटीचा दिवस असल्याने सांगलीच्या चांदोली येथे पर्यटनासाठी मित्र मित्र गेले होते. परिसरात फिरत सर्वानी मिळून जेवणाचा आनंद देखील घेतला. यानंतर आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले. मात्र पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली असून त्याचे शोधकार्य सुरु आहे. 

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील अभिषेक काळे (वय २५) असे नदीत पोहत असताना बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान अभिषेक व त्याचे काही मित्र हे रविवारची सुटी असल्याने पर्यटनासाठी चांदोली परिसरात आले होते. येथील उखळू पुलाजवळ त्यांनी पार्टी केली. त्यानंतर अभिषेकसह काही युवक हे जवळच असलेल्या वारणा नदीमध्ये आंघोळी करण्यासाठी उतरले. पोहत पोहत अभिषेक हा खोल पाण्यापर्यंत गेला. 

पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून 

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अभिषेक पाण्यात बुडू लागला. अभिषेक बुडत असल्याचे पाहून सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला. सोबतचे मित्र नदीतून बाहेर निघाल्यानंतर परिसरात घटनेची माहिती दिली. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे अनेक ग्रामस्थ तसेच कोकरूड व शाहुवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याचा शोध घेतला.  

रात्री उशिरापर्यंत शोधकार्य 

आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य घेण्यात येत होते. मात्र अंधार झाल्याने शोधकार्यात अडचण येत असल्याने अखेर शोधकार्य थांबविण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी देखील शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे मित्रांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांचा प्रवास होणार गारेगार; इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच सेवेत, कोणत्या मार्गांवर धावणार जाणून घ्या

Maharashtra Live News Update: वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

SCROLL FOR NEXT