Huge Hail in Sangli 's Shirala Saam TV
महाराष्ट्र

Sangli Weather News: शिराळ्यात झालेल्या गारपिटीत पडली भली मोठी गार; अवकाळी पावसाने साचले अनेक भागात पाणी

Sangli Rain Update: राज्यातील अनेक भागात मागील आठवड्यापासून अवकाळी पाऊस व वादळी वारा होत आहे. दरम्यान २६ मे पर्यंत काही ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाची शक्यता

विजय पाटील

सांगली : राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होत असून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे झालेल्या वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. या दरम्यान भल्या मोठ्या आकाराची गार देखील पडल्याचे पाहण्यास मिळाले.

राज्यातील अनेक भागात मागील आठवड्यापासून अवकाळी पाऊस (Rain) व वादळी वारा होत आहे. दरम्यान २६ मे पर्यंत काही ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान सांगलीच्या शिराळा (Shirala) तालुक्यात जोरदार [पाऊस झाला. तालुक्यातील पश्चिम भागातील चांदोली शेंडगेवाडीच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली होती. तर मुख्य मार्गावर पाणी साचले होते. परिसरात पाणीच पाणी झाले होते.

काही भागात गारपीट देखील झाल्याचे पाहावयास मिळाले. तसेच शेतकरी विलास मारुती पाटील यांच्या घराच्या (Sangli) परिसरात भल्या मोठ्या आकाराची गार पडली. ही मोठी गार पाहण्यासाठी नागरिकानी मोठी गर्दी केली होती. तर या गारेचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित झाले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असतानाच गार प्रत्यक्षात पाहण्यासाठी पाटील यांच्या घराकडे परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleepy after eating rice: भात खाल्ल्यानंतर प्रचंड झोप येते?

Success Story: वडील बस कंडक्टर, आई बीडी फॅक्टरीत काम करायची, परिस्थितीवर मात करत केली UPSC क्रॅक; IPS एस. इन्बा यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

SCROLL FOR NEXT