Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: गायरान जमिनीवर बांधली घरे; अतिक्रमण काढायला गेलेल्‍या सरपंचास दगडाने मारहाण

गायरान जमिनीत बांधली घरे; अतिक्रमण काढायला गेलेल्‍या सरपंचास दगडाने मारहाण

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) गायरान जमिनीत अतिक्रमण करून बांधलेली घरे काढण्यास गेलेल्या सरपंच सतीश निकम यांना दगडाने मारून जखमी केल्याची घटना नागेवाडी (Sangli News) येथे घडली आहे. विटा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दोन्हींकडील चौदा जणांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Breaking Marathi News)

नागेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश निकम व अन्य सरकारी कर्मचारी हे गायरान जमीनमध्ये संगीता मंडले, अनुसया मंडले यांनी केलेले अतिक्रमण काढण्यास गेले होते. या दरम्‍यान संगीता मंडले, अनुसया मंडले, किसाबाई मंडले आदी जणांनी जमाव जमवून अतिक्रमण काढत असताना शासकीय कामात अडथळा आणून लोकांच्या अंगावर मिरची पूड टाकून (Sarpanch) सरपंच सतीश निकम यास संतोष माने यांनी दगडाने मारून जखमी केले.

सरपंचावरही केला आरोप

दरम्यान, संगीता मंडले यांनी फिर्यादीत सरकारी कर्मचारी व सरपंच सतिश निकम अतिक्रमण काढण्यास आले असता संगीता मंडले व अनुसया मंडले यांनी सध्या कागदपत्रे ग्रामसेवकाला दाखवीत असताना सरपंच निकम यांनी संगीता मंडले यांना शिवीगाळ केली. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत काठीने मारले. अनुसया मंडले यांनाही ढकलून दिले. तसेच शिवीगाळ करून यांची घरे काढा, असे ओरडून धमकी दिली. तर सरपंच सतीश निकम, प्रशांत माने व आप्पासो निकम यांच्याकडून जीवितास धोका आहे असे म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

Politics : काँग्रेसचा 'पायलट' प्रोजेक्ट! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यांत मोठी उलथापालथ होणार

Pakistan Cricket Team : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय; पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

SCROLL FOR NEXT