बीड : बीड जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये अनेक मातब्बरांची (Beed) प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ९ बाजार समित्यांच्या (Bajar Samiti) १६२ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून यात २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्यांमधील कारभारी निवडून देतील. (Maharashtra News)
बीड जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांच्या १६२ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कडा बाजार समिती बिनविरोध झाली. त्यामुळे आता ८ बाजार समित्यांची निवडणूक येत्या २८ व ३० एप्रिलला होत आहे. यासाठी २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्यांचे कारभारी (Bajar Samiti Election) निवडणार आहेत. त्यामुळे कोण कुठं बाजी मारणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
परळीत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये सर्वपक्षीयांकडून जयदत्त क्षीरसागर यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.