Sangli News: एकनाथ शिंदेने यांनी घोषणा केली होती. शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र शेतकरी (Farmer) आत्महत्या मुक्त करू. परंतु त्यांच्याच काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. यांनी फक्त खोक्याच्या (Sangli News) आणि एकमेकांचा बदला घ्यायचा आणि कमरेखाली वार करायच्या, या सगळ्या राजकारणातून बाहेर पडावे. एकदा महाराष्ट्र फिरून बघावा. महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले प्रश्न बघावे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि मग राज्य कारभार चालवावा असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. (Tajya Batmya)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारी संघटना असून शेतकरी प्रश्नासाठी कायम लढत राहिल असेही त्यांनी सांगितले.
कृषिमंत्र्यांचे काय करावे?
गेल्या आठ दिवसांपासून राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष, डाळिंबा असेल त्याचबरोबर गहू, हरभरा, मका आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. अशात संवेदनशीलपणाने हा प्रश्न सरकारने हाताळलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे कृषिमंत्री रात्री पाहणी करायला लागले. तेव्हा या कृषिमंत्र्याचे काय करायचे. एकदा म्हणतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जुना विषय, तर नुकसानभरपाईची रात्री पाहनी करतात.
सर्व राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी
गेल्या अर्धा वर्षामध्ये आमच्या लक्षात आले की सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. विरोधात असल्यानंतर शेतकऱ्यांचे भाषा बोलतात, शेतकऱ्यांची बाजू घेतात आणि सत्तेत गेल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांनाच विसरतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ताकद दाखवायची असेल आणि सत्ता कोणाची असो सभागृहामध्ये ताकतीने शेतकऱ्यांची बाजू मांडायची असेल तर कुठल्याही आघाडीशिवाय सभागृहात माणसं पाठवली पाहिजेत. तरच ती ताकतींना आणि निरपेक्षपणाने शेतकऱ्यांची बाजू मांडतील. म्हणून आम्ही हातकणंगले सहित पाच लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.