Abdul Sattar: शेतकऱ्यांना पंचनाम्‍यानंतर पिकांनुसार नुकसान भरपाई; अब्‍दुल सत्‍तार

शेतकऱ्यांना पंचनाम्‍यानंतर पिकांनुसार नुकसान भरपाई; अब्‍दुल सत्‍तार
Abdul Sattar
Abdul SattarSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार ३६०० पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पिकानुसार पंचनामे करण्यात येत असून (Farmer) शेतकऱ्यांना सरसकट भरपाई न देता पिकांच्या झालेल्या नुकसानीनुसार भरपाई देण्यात येईल. विधिमंडळाच्या अधिवेशनातच भरपाई संदर्भातली घोषणा करण्यात येईल; अशी माहिती (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात दिली. (Latest Marathi News)

Abdul Sattar
Cyber Crime: नावाचा गैरवापर होत असल्‍याचे सांगत फसवणूक

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नंदुरबार जिल्ह्यात आले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

Abdul Sattar
Dhule News: कोट्यावधीचा गुटखा, पानमसाला जप्‍त; सात जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

राऊतांनी राजीनामा दिला नाही तर..

खासदार संजय राऊत यांनी यांनी पुढची गुढी आपलीच असणार असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर देत संजय राऊत जीवनात कधीच खरं बोलत नाही. जे आमच्या मतांवर निवडून आलेले आहेत; त्यांनी आम्हाला शिकवण्याचे काम नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर दादा भुसे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारावे आणि पुन्हा निवडून दाखवावे. त्यावेळेस तुमच्या सरकार येईल आणि संजय राऊत आणि राजीनामा दिला नाही. तर दोन-चार पिढी यांच्या सरकार येणार नाही. संजय राऊत यांच्या नातू जरी आला तरी सरकारमध्ये येणार नाही ते असं मध्ये अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com