Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

Shreya Maskar

नाशिक

नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. तुम्ही येथे दिवाळी ट्रिप प्लान करा. निसर्गाच्या सानिध्यात सुंदर वेळ घालवता येईल.

Nashik | google

इंद्राई किल्ला

चांदवड परिसरातील सातमाळा डोंगररांगेत असलेला इंद्राई किल्ला तुलनेने कमी भेट दिला जाणारा किल्ला आहे. डोंगरमाथ्यावरील अवशेष आणि आजूबाजूच्या पर्वतरांगांचे दृश्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

Indrai Fort | google

कावनई किल्ला

इगतपुरी तालुक्यातील हा छोटा आणि निसर्गरम्य किल्ला आहे. प्रवेशद्वाराचे अवशेष, गुहा आणि सह्याद्रीचे सुंदर दृश्य यामुळे हा हटके ट्रेकसाठी बेस्ट आहे.

Kawanai Fort | google

देहेरगड किल्ला

देहेरगड किल्ल्याला भोरगड असेही म्हणतात. हा डोंगरी किल्ला आहे. शांत वातावरण, खडकाळ चढाई आणि माथ्यावरून दिसणारे निसर्गदृश्य हे त्याचे आकर्षण आहे.

Dehergarh Fort | google

न्हावीगड किल्ला

बागलाण परिसरातील न्हावीगड किल्ल्यावर तुलनेने कमी ट्रेकर्स जातात. डोंगररांगांचे विहंगम दृश्य, जुन्या पाण्याच्या टाक्यांचे अवशेष आणि खडकाळ वाट येथे पाहायला मिळतात.

Nhavigad Fort | google

भास्करगड

भास्करगड किल्ल्याला बसगड असेही म्हणतात. त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगांतील हा तुलनेने कमी गजबजलेला किल्ला आहे. खडकाळ चढाई, विस्तीर्ण पर्वतरांगा आणि निसर्गरम्य माथा हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

Bhaskargad | google

मोरधन किल्ला

घोटी–इगतपुरी परिसरातील हा ऑफबीट डोंगरी ट्रेक आहे. विस्तीर्ण माथा, आजूबाजूच्या टेकड्या आणि शांत निसर्ग यामुळे फोटोग्राफीसाठीही चांगला पर्याय आहे.

Mordhan Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

Wai Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...