Ramdas Athawale Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale: संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर; मंत्री रामदास आठवले

संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

विजय पाटील

सांगली : खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही. राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करून २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. (Maharashtra News)

सांगलीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री आठवले (Ramdas Athawale) बोलत होते. छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्त ५ आणि ६ मे २०२३ ला (Kolhapur) कोल्हापूरला आरपीआयचे अधिवेशन आयोजित केले आहे. ६ तारखेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या आघाडीचा काही उपयोग नाही

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले. तर फार परिणाम होणार नाही. कारण भीम शक्ती माझ्याकडे आहे. शिंदे यांचे मोठे बंड आहे. शिवय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही.

अगोदर कॉंग्रेस जोडा

राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तर तोडण्याची यात्रा आहे. पहिले काँग्रेस जोडा. राहुल गांधी पंतप्रधान होणे अशक्य आहे; असा टोलाही मंत्री आठवले यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

हाफिज सईद पुन्हा भारतावर हल्ल्याच्या तयारीत, बांगलादेशातून...., 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ

Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, हे काम कराच, अन्यथा ₹ १५०० रूपये होतील

SCROLL FOR NEXT