Sangli Jail Saam tv
महाराष्ट्र

Sangli Jail : धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहात कैद्यांकडे गांजा; तिघा कैद्यांवर पोलीसात गुन्हा

Sangli News : सांगलीतील वाढत्या नशेखोरी विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्स नियुक्त केली आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून पोलिसांचे छापा सत्र सुरू असताना नशेखोरी संबंधित एक कहर दिसून आला

विजय पाटील

सांगली : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना बाहेरून वस्तू पुरविण्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे. यातच सांगलीच्या जिल्हा कारागृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात कारागृहात असलेल्या कैदींकडे गांजा व चिलम आढळून आल्या आहे. कारागृहातच गांजा ओढला जात असल्याचे समोर आले असून या प्रकरणी तीन कैदींवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगलीतील वाढत्या नशेखोरी विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्स नियुक्त केली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून पोलिसांचे छापा सत्र सुरू असताना नशेखोरी संबंधित आणखी एक कहर दिसून आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भेटून कैद्यांकडे गांजा आणि चिलीम आढळली आहे. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून कारागृहात गांजा गेला कसा? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्वच्छता गृहात ओढत होते गांजा 

कारागृहात २९ मार्चला सकाळी सव्वादहाच्या सुमारास बॅरेक क्रमांक तीनच्या स्वच्छता गृहात तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्यात गांजा ओढताना दिसून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलिम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले. अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. 

तिघांविरोधात गुन्हा दाखल 

दरम्यान कारागृहात गांजा ओढणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण, किरण लखन रणदिवे, संवेद सावळवाडे या तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. तर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बाहेरून गांजा आणि अमली पदार्थ पुरवण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. आता थेट कैदींच्या हातातच गांजा मिळाल्यानंतर ते गांजा ओढताना आढळल्यामुळे कारागृहाची सुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बडा नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT