Pimpri chinchwad : प्राणी संग्रहालयातील सापांसाठी साडेआठ लाख रुपयांचे उंदीर खरेदी; दोन वर्षांसाठी पुरविले जाणार खाद्य

Pimpri chinchwad News : प्राणी संग्रहालय नूतनीकरणासाठी मागील नऊ वर्षांपासून बंद आहे. या प्राणी संग्रहालयात सर्प, विविध जातीचे पक्षी, मगर, कासव असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाच्या वतीने सांभाळण्यात येत आहे
Pimpri chinchwad
Pimpri chinchwadSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात असलेले निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय गेल्या नऊ वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी इतर प्राणी सोडले तर केवळ सापांच्या विविध प्रजाती आहेत. साधारण हा प्राणी संग्रहालयात ५२ साप असून या सापांसाठी ८ लाख ६१ हजार ८४० रुपयांचे पांढरे उंदीर खरेदी करण्यात आले आहेत. हे उंदीर सापांना खाद्य म्हणून पुरविले जात असते. 

पिंपरी चिंचवड शहरातील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरणासाठी मागील नऊ वर्षांपासून बंद आहे. या प्राणी संग्रहालयात सर्प, विविध जातीचे पक्षी, मगर, कासव असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाच्या वतीने सांभाळण्यात येत आहेत. मात्र याठिकाणी असलेले इतर प्राणी संग्रहालयातही स्थलांतर करण्यात आले असते. पण त्या ठिकाणी जागा नसल्याने आम्हाला ते सांभाळावे लागत असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

Pimpri chinchwad
Shirdi : शिर्डीत संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचे होणार उत्पादन; डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन

अन्य प्राणी संग्रहालयाशी पत्र व्यवहार 

या प्राण्याच्या स्थलांतरासाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथील प्राणी संग्रहालयाशी पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या ९ वर्षांपासून लाखों रुपये या प्राण्यावर खर्च केले जात आहेत. हे प्राणी संग्रहालय सुरू करण्यासाठी आजुन किती वेळ लागणार याबाबत काही माहिती समोर आली नाही. मात्र या प्रशासन प्राणी संग्रहालयातील प्राणी सांभाळण्यासोबत ठेकेदार ही सांभाळत असल्याचे दिसून येत आहे.

Pimpri chinchwad
Dhule : अनधिकृत सोनोग्राफी केंद्रावर छापेमारी; गर्भपाताची तयारी सुरु असतानाच कारवाई, महिला डॉक्टर ताब्यात

प्रति उंदीर १५९ रुपये 

दरम्यान येथील सापांसाठी खाद्य म्हणून पांढरे उंदीर खरेदी करण्यात आले आहेत आहेत. अर्थ प्रति उंदीर १५९ रुपये दराने ही खरेदी करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी हे उंदीर खाद्य म्हणून प्राणी संग्रहालयातील सर्पाना पुरविले जाणार असुन एक किंवा दोन उंदीर आठवड्यातून एका सर्पालास खायला दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com