Sangli Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Sangli News: अखेर ड्रोन उडवणारे तरुण सापडले! विटा पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात; चौकशीत वेगळंच कारण समोर

Sangli Latest News: ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. सांगलीमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या दोघांना नागरिकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. यावेळी चौकशीत वेगळेच कारण समोर आले आहे.

विजय पाटील

सांगली, ता. १२ सप्टेंबर २०२४

Sangli Drone Flying News: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागामध्ये ड्रोनने घिरट्या घातल्याच्या घटना घडत आहेत. जालनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या गावात ड्रोन फिरत असल्याचे समोर आल्यानंतर या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याची प्रकरणे उघडकीस आली होती.

बीड जालनासह सांगली, सातारा, बारामती, सोलापूर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अशातच आता सांगलीमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडवणाऱ्या दोघांना नागरिकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. यावेळी चौकशीत वेगळेच कारण समोर आले आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसापासून सांगली जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार ही घडल्याने ग्रामस्थ भयभीत होते. तर रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्याचे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसापासून पोलिस याचा शोध घेत होते. ही ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

बुधवारी (ता. ११ सप्टेंबर) दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील लोकांच्या निदर्शनास आले. या लोकांनी त्यांना तातडीने पकडून या ड्रोनबाबत विचारणा केली व त्यांना विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये भारत सर्वांगीण या कंपनीतर्फे रस्त्याचा सर्वेसाठी ड्रोन उडवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रात्रीचे ड्रोन आकाशात उडत आहेत. याची तक्रार अनेक ठिकाणाहून पोलीस स्टेशन मध्ये येत आहे. काल असाच ड्रोन उडत असल्याचा प्रकार समोर आला होता. ग्रामस्थांनी त्याला विचारपूस करत आमच्या स्वाधीन केले आहे. पण भारत सर्वांगीण या कंपनीतर्फे रस्त्याचा सर्वे साठी ड्रोन उडवले जात असल्याचा निष्पन्न झाले आहे, अशी माहिती विटाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे.

दरम्यान, ग्रामीण भागांमध्ये अशाप्रकारे ड्रोन फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी करत रात्री दरोडा टाकतात, अशाही अफवा पसरल्या आहेत. तसेच काही ठिकाणी चोरीच्याही घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अशातच आता सांगलीमध्ये सापडलेल्या या ड्रोन प्रकरणामध्ये वेगळेच कारण समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT