जबरदस्त ठुमके अन् दिलखेचक अदांनी सिनेसृष्टीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मराठीसह बॉलिवूडविश्वातही अमृताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अमृताने चित्रपट, रिअॅलिटी शो कार्यक्रमामधून घराघरात पोहचली आहे.
अभिनय आणि सौंदर्यासह अमृताला तिच्या नृत्यकौशल्याने खरी ओळक मिळवून दिली आहे. अमृताने नटरंग या चित्रपटातील तिच्या वाजले की बारा या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रवी जाधव दिग्दर्शित २०१० नटरंग हा चित्रपट अमृतासाठी लकी ठरला. दिलखेचक अदा, मराठमोळा लूक अन् साजश्रृंगार असा अमृताचा लूक पाहून काळजाचा ठोका चुकतो. चित्रपटातील अमृताच्या वाजले की बारा या गाण्याच्या नृत्याने अक्षरश: धुमाकूळ घातला.
अमृता खानविलकरचा जन्म मध्यम कुटुंबात २२ नोव्हेंबर १९८४ मध्ये झाला आहे. मुळची मुंबईची अमृता असली तरी तिचं शिक्षण पुण्यात झालं आहे. पुण्यातील कर्नाटक शाळेतून अमृताने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण अमृताने कॉमर्समधून केलं आहे. पुढे अमृताला नृत्याची आवड निर्माण झाली. अमृताने सिनेसृष्टीत पदार्पण केले अन् तिचं नशिब चमकलं.
अभिनय आणि सौंदर्यासह अमृताला तिच्या नृत्यकौशल्याने खरी ओळक मिळवून दिली आहे. अमृताने नटरंग या चित्रपटातील तिच्या वाजले की बारा या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रवी जाधव दिग्दर्शित २०१० नटरंग हा चित्रपट अमृतासाठी लकी ठरला. दिलखेचक अदा, मराठमोळा लूक अन् साजश्रृंगार असा अमृताचा लूक पाहून काळजाचा ठोका चुकतो. चित्रपटातील अमृताच्या वाजले की बारा या गाण्याच्या नृत्याने अक्षरश: धुमाकूळ घातला.
अमृताच्या गोलमाल, साडेमाडे तीन, नटरंग, कट्यार काळजात घुसली, झकास, धुसर, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, बाजी अशा अनेक चित्रपटातून अमृताने आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही तिच्या नृत्याची जादू दाखवली आहे. अमृताच्या‘चंद्रमुखी’ या लावणी नृत्याने देखील सर्वांनाच थक्क केले आहे. या गाण्यातील अमृताच्या नृत्यांवर प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.