Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News: दुर्दैवी! हायव्होल्टेज वायरला क्रेनचा स्पर्श, विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू

Kupwad MIDC Accident: सांगलीच्या कुपवाडा एमआयडीसीमध्ये रात्री भयंकर घटना घडली. हायव्होल्टेज वायरला क्रेनचा स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू झाला.

Priya More
  • सांगलीच्या कुपवाड एमआयडीसीमध्ये भयंकर घटना

  • हायव्होल्टेज वायरला क्रेनचा स्पर्श झाला

  • क्रेनमध्ये वीजप्रवाह उतरल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू

  • मेनन पिस्टन चौकात क्रेनच्या हुकाचा हायव्होल्टेज वायरचा स्पर्श झाला

विजय पाटील, सांगली

सांगलीच्या कुपवाड एमआयडीसीतील भयंकर घटना घडली. मेनन पिस्टन चौकात क्रेनमधून लोखंडी साहित्याची वाहतूक करत असताना क्रेनच्या हुकाचा हायव्होल्टेज विद्युतवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा धक्का लागल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशवंतनगरमध्ये राहणाऱ्या प्रदीप दिलीप खराडे आणि कुपवाड येथे राहणारा रोहिदास भगवान उत्तरे या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप खराडे आणि रोहिदास उत्तरे हे दोघे बुधवारी रात्री एकाच क्रेनमधून कुपवाड एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौकातून इंडस्ट्रियल बॉयलर पद्धतीचा लोखंडी पार्ट घेऊन जात होते. क्रेनच्या पुढील हुकला हा लोखंडी पार्ट अडकविण्यात आला होता. चौकात क्रेन पोहोचली असता हुकाचा विद्युत खांबावरील हायव्होल्टेज वाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत प्रवाह थेट क्रेनमध्ये उतरला आणि दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला.

विजेचा धक्का लागल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन खाली पडले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांना उपचारासाठी तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कुपवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

SCROLL FOR NEXT