Maharashtra MIDC : बारामतीजवळ १००० एकरमध्ये एमआयडीसी, हजारो लोकांना रोजगार मिळणार, अजितदादांचे स्वप्न साकार

Maharashtra Indapur MIDC project : बारामतीजवळील इंदापूर येथे १००० एकरमध्ये नवीन एमआयडीसीला मंत्रिमंडळाची मंजुरी. रत्नपुरी मळ्यातील जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय. हजारो युवकांना रोजगाराच्या संधी आणि पुणे जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार.
Maharashtra MIDC
Maharashtra MIDCSaam TV Marathi
Published On

1000 acre MIDC project approved near Baramati : बारामतीपासून हाकेच्या अंतारवर असलेल्या इंदापूरमध्ये एक हजार एकरमध्ये एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) तयार होणार आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळात याला मंजूरी दिली आहे. एमआयडीसीसाठी महत्त्वाचे असलेली एक हजार एकर जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच एमआयडीसीच्या कामाला सुरूवात होईल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. इंदापूरमधील हजारो तरूणांच्या हाताला काम मिळेल, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली आहे.

इंदापूरमध्ये एमआयडीसी व्हावी, असे स्वप्न दिवंगत अजित पवार यांचे होते. त्यांचं हे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. कारण, इंदापूरजवळच्या रत्नपुरी मळ्यात नवी 'एमआयडीसी'सुरू होणार आहे. रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. या एमआयडीसीमुळे इंदापूर आणि आजूबाजूच्या भागात हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

Maharashtra MIDC
Gold Rate Today : भारत बंद असतानाच सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा इतकी किंमत, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

मंत्रिमंडळात रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमिनीचा निर्णय घेतल्याने इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय फडणवीस सरकारने घेतला. त्यामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

Maharashtra MIDC
धक्कादायक! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा बुधवार पेठेत पाठवले, पुण्यातील धक्कादायक घटना

इंदापूर तालुक्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्मितीचे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. इंदापूरचे आमदार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही यासाठी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळाले आहे. या निर्णयामुळे इंदापूर, बारामती व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार आहेच. त्याशिवाय हजारो युवकांना रोजगाराच्या संधी, स्थानिक उद्योजकतेला चालना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

Maharashtra MIDC
मोठी बातमी! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीची महत्त्वाची अपटेड समोर, ‘या’ १४ जिल्ह्यांना सर्वाधिक पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com