रणजीत मांजगावकर, साम टीव्ही, सांगली
सांगली महापालिकेच्या विशेष महासभेत आज, गुरुवारी तुफान गोंधळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूर नियंत्रणासाठी एमआरडीसी अंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रासाठी ६०० कोटींच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पाच्या निविदांमध्ये प्रशासकीय काळात मोठ्या त्रुटी झाल्याचा आरोप करत आज विशेष महासभा बोलावण्यात आली होती. या सभेत एमआरडीसीच्या तब्बल ५९२ कोटी रुपयांच्या प्रकल्पावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजप नेत्यांवर टक्केवारीचा गंभीर आरोप केला.
या आरोपानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक आमनेसामने आले. जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही गटातील नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. विरोधी पक्षनेत्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी महापौरांसह भाजप नगरसेवकांनी केली. मात्र, मंगेश चव्हाण यांनी शब्द मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. ‘भाजप पुढे झुकणार नाही, काय कारवाई करायची आहे ती करा,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं. महासभेत प्रकल्पाच्या डीपीआरसह कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांच्या सोयीचं काम झालं पाहिजे, असे निर्देश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिले. विरोधी पक्षनेते केवळ स्टंटबाजी आणि प्रसिद्धीसाठी बेछूट आरोप करत असल्याची टीका महापौरांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.