मेष (Aries)
मेष राषींच्या लोकांना आज स्वतःला कामात सिद्ध करण्याची संधी मिळेल. पैशांच्या बाबतीतही शुक्रवारचा दिवस चांगला असेल.पण खर्चावर बारीक लक्ष ठेवावे लागेल. त्याशिवाय आज भावनांवर नियंत्रण नक्कीच ठेवा. नातेसंबंधांमध्ये संवेदनशीलता जपा. प्रकृती ठीक राहील, परंतु निष्काळजीपणा करू नका.
वृषभ (Taurus)
आजचा दिवस थोडा चढ-उताऱ्याचा राहू शकतो. कामात संयम ठेवा आणि कोणाशीही वाद घालणे टाळा. खर्च करताना काळजी घ्या. नातेसंबंधात पारदर्शकता आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. प्रकृती ठीक राहील, पण तणावापासून दूरच राहावे.
मिथुन (Gemini)
कामात छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा चुका होऊ शकतात. खर्च वाढू शकतो, त्यामुळे अनावश्यक खरेदी करणे टाळा. नातेसंबंधात नको तो जास्त विचार करणे टाळा आणि गोष्टी सोप्या ठेवा. आरोग्याबाबत सतर्क राहा, पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
कर्क (Cancer)
नवीन कल्पना आणि योजनांसाठी दिवस चांगला आहे. कामात काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. नात्यांमध्ये सहकार्य आणि परस्पर समज कायम राहील. प्रकृती सामान्य राहील आणि मन हलके वाटेल.
सिंह (Leo)
आज मेहनत थोडी जास्त करावी लागेल. कामाचा ताण राहील, परंतु त्याचे परिणाम समाधानकारक मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ नये म्हणून वेळ काढून संवाद साधा. आरोग्याची थोडी काळजी घ्या.
कन्या (Virgo)
दिवस अपेक्षेप्रमाणे उत्तम राहील. करिअरमध्ये नवीन संधी किंवा एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि जुन्या प्रयत्नांचे सकारात्मक फळ मिळेल. प्रेमजीवनात आनंद आणि आपलेपणाचा अनुभव येईल. प्रकृती उत्तम राहील आणि मन उत्साही असेल.
तूळ (Libra)
तूळ राशींच्या लोकांच्या आयुष्यात समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे ठरेल. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात विचारपूर्वक निर्णय घ्या. ऑफिसमधील कोणताही मोठा निर्णय काही काळासाठी पुढे ढकला. पैशांचे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करा. आज मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या. प्रकृती सामान्य राहील.
वृश्चिक (Scorpio)
आजचा दिवस तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामात तुमच्या मताला महत्त्व व प्रशंसा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि रखडलेले काम पुढे सरकेल. प्रेमसंबंधात गोडवा राहील आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. प्रकृती चांगली राहील, फक्त खाण्यापिण्याची काळजी घ्या.
धनु (Sagittarius)
दिवस थोडा भावनिक राहू शकतो. कुटुंब किंवा वैयक्तिक नातेसंबंधांच्या गोष्टी मनावर परिणाम करतील. कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल, पण तुम्ही समजूतदारपणे परिस्थिती सांभाळाल. आर्थिक स्थिरता कायम राहील. प्रकृती सामान्य राहील, मात्र अपूर्ण झोपेमुळे थकवा जाणवू शकतो.
मकर (Capricorn)
प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल. कामाचा ताण आणि एखाद्या निर्णयाबाबत द्विधा मनःस्थिती राहू शकते. खर्च वाढण्याचे संकेत आहेत, त्यामुळे बजेटवर लक्ष ठेवा. छोट्या-छोट्या गोष्टींवरून नात्यात तणाव होऊ शकतो, पण संभाषणाने सर्व सुरळीत होईल. मानसिक थकवा जाणवू शकतो.
कुंभ (Aquarius)
संयम आणि समजूतदारपणाने पुढे जाण्याचा दिवस आहे. ऑफिसमध्ये तुमची मेहनत रंग आणेल आणि वरिष्ठांचा विश्वास वाढेल. भविष्यासाठी पैशांचे योग्य निर्णय घेऊ शकाल. मोकळेपणाने संवाद साधल्याने जवळीक वाढेल. पारिवारिक वातावरण सुखद राहील. प्रकृती सामान्य राहील, खाण्यापिण्यात हलगर्जीपणा करू नका.
मीन (Pisces)
दिवस थोडा अस्थिर राहू शकतो. कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे शरीर आणि मन थकून जाईल. आर्थिक स्थिती संतुलित राहील, पण अतिरिक्त खर्च खिशावर ताण देऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे टाळा, अन्यथा प्रकरण बिघडू शकते. घरच्यांची साथ मिळेल. आरामाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
(टीप: ज्योतिषशास्त्रानुसार दिलेली ही माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. अचूक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.