Nitesh Karale Crying : ६ वर्षासाठी राष्ट्रवादीतून हाकालपट्टी, कराळे मास्तर ऑन कॅमेरा ओक्साबोक्शी रडले

Nitesh Karale latest new : नितेश कराळे मास्तर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत भावूक झाले. पक्षासाठी ११० सभा घेतल्याचा दावा करत त्यांनी कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या दबावाचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
Nitesh Karale latest news
Nitesh Karale latest newssaam tv
Published On: 

चेतन व्यास, वर्धा प्रतिनिधी

Nitesh Karale Master : नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. पण यावेळी बोलताना ते प्रचंड भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. ते ऑन कॅमेरा ढसाढसा रडले. राष्ट्रवादीने केलेल्या या कारवाईची माहिती आपल्याला माध्यमांतूनच मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हकालपट्टीची खंत

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात आपण पक्षासाठी राज्यभर प्रचार केला. स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या विजयासाठी आपण तब्बल ११० सभा घेतल्या. मात्र या सगळ्या मेहनतीची परतफेड पक्षानं हकालपट्टी करून केल्याची खंत कराळे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार केला, परंतु ही कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले.

Nitesh Karale latest news
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'या' लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली, राज्य सरकारकडून यादी तयार

शंभरहून अधिक पोलीस केसेस

सर्वसामान्यांसाठी लढा देताना आपल्यावर शंभरहून अधिक पोलीस केसेस दाखल झाल्या, दोन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आणि आठ दिवसांचा तुरुंगवासही भोगला. हे सर्व जनतेसाठी लढल्याचे आपल्याला मिळालेले 'बक्षीस' असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, या बिकट परिस्थितीत किंवा तुरुंगवास भोगत असताना पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

Nitesh Karale latest news
Election: पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा दणका; कराळे मास्तरांची थेट ६ वर्षांसाठी पक्षातून हाकालपट्टी

काँग्रेसचा दबाव असल्याचा संशय

या संपूर्ण कारवाईमागे काँग्रेस पक्षाचा दबाव असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यंनी सांगितले. काँग्रेसने आपल्याला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मदत न करण्याची भूमिका घेत कारवाईची मागणी केल्याची माहिती मिळाल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले.

आपण नेहमीच जनतेच्या हितासाठी आणि हक्कासाठी लढलो असून, आता जनता आणि मतदारच उद्याच्या मतदानातून या अन्यायाला चोख उत्तर देतील आणि आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा ठाम विश्वास नितेश कराळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com