स्व.पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधी स्थळी धनंजय मुंडे नतमस्तक.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीचे दर्शन.
नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील नाग्या-साग्या परिसरात आज तिहेरी अपघाताची घटना घडली. कांद्याने भरलेला पिकअप पलटी झाल्याने रस्त्यावर कांदा विखुरला असून, संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत या घटनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. मालेगावकडून नांदगावच्या दिशेने कांदा घेऊन जाणाऱ्या पिकअपला पाठीमागून येणाऱ्या प्रवासी लक्झरी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पिकअप पलटी झाला आणि त्यातील कांदा रस्त्यावर विखुरला.दरम्यान, नांदगावकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचीही पिकअपला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, प्रवासी लक्झरी वाहन रस्त्याच्या कडेला कलंडले.सुदैवाने, या अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र, कांद्याचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
रामदास कदम जे बोलतात, त्याला एकनाथ शिंदेंची मान्यता आहे का? नितेश राणेंचा सवाल...
या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट करावी ; नितेश राणेंची प्रतिक्रिया....
उद्धव ठाकरे आघाडीत शिंदेंना संपवत होते, त्यावेळी फडणवीस आणि भाजपाने साथ दिली नसती तर आज कोणता दिवस पाहायला मिळाला असता? राणेंचा सवाल...
महायुतीत सगळं व्यवस्थित सुरू असताना कोणीही मिठाचा खडा टाकू नये, जेणेकरून मातोश्रीला गुदगुल्या होतील...
- ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी २५ ऑक्टोबरला ५५० लोक एकत्रित शंखनाद करणार
- शंखनादाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार
- तर ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशीही गोदावरीच्या महाआरतीचं आयोजन
- विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु उपस्थित राहणार असून 6500 आदिवासी बांधवांना निमंत्रण
- ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी रामकुंड परिसरातील कामे पूर्ण होतील कुंभमेळा आयुक्तांना आशावाद
बोरीवलीतील ४९० खाटांचे भगवती रुग्णालय PPP मॉडेलवर चालवण्यासाठी पालिकेची निविदा प्रक्रिया सुरू
रुग्णालयाच्या ५०% खाटा पालिका रुग्ण आणि सरकारी आरोग्य योजनांसाठी राखीव
रुग्णालयाची जमीन आणि इमारतीची १००% मालकी पालिकेकडेच राहणार
खासगी संस्थेला रुग्णालयात किमान १५० कोटींची गुंतवणूक करावी लागणार
पालिकेला दरवर्षी किमान ६.५६ कोटी रुपये भाडे मिळणार
ओपीडी तपासणी शुल्क फक्त १० रुपये; उपचारांच्या दरांवर पालिकेचे नियंत्रण
रुग्णालयात ९० आयसीयू खाटा, ९ ऑपरेशन थिएटर्स, एमआरआय आणि सीटी स्कॅनची सुविधा
खासगी संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेचा विशेष अधिकारी नेमणार
* ५ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाकडून राज्यभरात ९३७ तपासण्या.
* तपासणीत त्रुटी आढळल्याने संबंधितांना ४५० नोटिसा बजावल्या.
* मुंबईतील औषध प्रयोगशाळेत ११९ औषध नमुन्यांची चाचणी; १० नमुने अप्रमाणित.
* मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील प्रयोगशाळांमध्ये एकूण २७९ नमुन्यांची चाचणी; २१ नमुने अप्रमाणित.
* अप्रमाणित नमुन्यांमध्ये १८ कमी दर्जाचे, २ मिथ्याछाप आणि १ बनावट औषधाचा नमुना.
* राज्यात विनापरवाना औषधे व सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन-विक्रीविरोधात ५ कारवाया.
* एकूण २८.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका प्रकरणात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक.
* नागरिकांनी औषधे केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडून बिलासह खरेदी करण्याचे FDA चे आवाहन.
नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक...
मंत्री नितेश राणे यांनी पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ नाकारले...
भाजप पदाधिकाऱ्यांनी नितेश राणे यांच्या स्वागतासाठी आणले होते पुष्पगुच्छ....
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुष्पगुच्छ घेण्यास नकार...
रस्त्यावर फटाके फोडल्यास होणार कारवाई; पोलिसांची नियमावली जाहीर
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडण्यास बंदी असेल. पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांच्या वापरास मुभा राहणार असून, विशिष्ट आकाराच्या ॲटमबॉम्बवरही कायदेशीर निर्बंध लागू असतील.
- नाशिक पेठ रस्त्यावर उमराळे गावाजवळ भीषण अपघात
- दुचाकी आणि टेम्पो समोरासमोर येऊन धडकल्याने झाला अपघात
- अपघातानंतर टेम्पो आणि दुचाकीने घेतला पेट
- दुचाकी टेम्पोच्या खाली अडकून घसरत गेल्यानंतर टेम्पोच्या डिझेल टॅंकचा झाला स्फोट
- दुचाकी वरील चालक बाजूला फेकला गेल्याने आणि चार चाकी टेम्पोतील ड्रायव्हरने वेळीच उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला
- अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यासह लगतच्या गावांमध्ये जोरदार पाऊस
नारुर, घोटगे पंचक्रोशी, माणगाव खोऱ्यात पाऊस
भातकापणी सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता
पुढील तीन-चार तासांसाठी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
पुण्यात डेंग्यूमुळे पहिला बळी गेल्याने महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या, डासांची उत्पत्तीस्थळे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती मागवण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भीमाले यांनी केली आहे. दरम्यान, डेंग्यूचे दोन रुग्ण चिंताजनक असल्याची माहिती समोर आली असून, प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणीपुरवठा करणारी उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. सण-उत्सवांनंतर मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीपात्रात टाकण्यात आल्याने नदीत कचऱ्याचा खच साचला आहे. त्यातच काही कंपन्यांचे दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. याचा परिणाम जलचरांवर होत असून माशांच्या मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. एकीकडे पाणीकपातीचे संकट असताना उल्हास नदी स्वच्छ ठेवून नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असून, दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ४०.६० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतदानाच्या टक्केवारीत फरक दिसून येत आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान टक्केवारी
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026
दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हानिहाय मतदान
गडचिरोली – 46.51%
वर्धा – 46.42%
चंद्रपूर – 42.52%
गोंदिया – 41.36%
भंडारा – 36.85%
नागपूर – 36.13%
नागपूर विभागात एकूण 38.88% मतदान
नवी मुंबईतील ऐरोली आणि खारघर येथील VIBGYOR हायस्कूलला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत विभागातील सर्व ८ जिल्ह्यांमध्ये ३६.०२% मतदान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ३९.९१% मतदान नोंदवले गेले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३३.०४% मतदान झाले असून ते विभागात सर्वात कमी आहे.
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावरून किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील अनेक भागांत AQI १५० ते २०० च्या पुढे गेला असून, BKC, माझगाव, चेंबूर, कुर्ला, अंधेरी आणि घाटकोपरमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
पालघरच्या सफाळे परिसरातील एस्सार समूहाच्या गॅस टू केमिकल प्रकल्पावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून १,२१६ हेक्टर जमीन संपादित केली जात असून, प्रदूषणाच्या भीतीने स्थानिकांनी जनता दरबारात विरोध नोंदवला.
नागपूरमध्ये पदवीधर मतदार संघाचा 8 ते 12 पर्यंत 23.93 टक्के मतदान झाले आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ मध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २०.८४ टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे. या मतदानात पुरुषांची टक्केवारी २२.५४, तर महिलांची १५.३८ टक्के आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, धाराशिवमध्ये सर्वाधिक २२.८९ टक्के मतदान झालं आहे. बीडमध्ये २१.९६, जालन्यात २१.६० आणि परभणीत २१.५४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये २१.२०, हिंगोलीत १९.८८ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १९.६४ टक्के मतदान झालं आहे. तर लातूरमध्ये सर्वात कमी १९.३३ टक्के मतदान नोंदवलं गेलं असून, पुढील मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष लागलं आहे.
नवी मुंबईतील एरोली येथील विबग्योर शाळेत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शाळा रिकामी करण्याचे काम सुरू असून, पालकांना मेसेज करून मुलांना घरी घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे. या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघाच्या स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे कौस्तुभ गावडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सत्ताधारीच सोडवू शकतात, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली.
मुलुंड पश्चिमेतील विठ्ठल नगर मधील सेवाराम लालवाणी रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाच्या कामाला चार वर्षांपासून विलंब झाला आहे.यामुळे या मार्गावरील वाहतूक चार वर्षांपासून बंद आहे.
एसआयआर प्रक्रियेतील फॉर्म क्रमांक 6 वरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे.
मावळमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन
मोजणीला आलेले अधिकारी परतले हात हलवत
बाधित शेतकऱ्यांना वैयक्तिक नोटीस न देता अधिकाऱ्यांचा मोजणीचा घाट
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील पिंपळगाव गाढे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब पदवीधर मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांनी लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर केला.
सीबीडी येथे २५ झाडांवर विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न
पर्यावरण प्रेमींकडून बाब उघड
सीबीडी किल्ला गावठाण येथील धक्कादायक प्रकार
रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या झाडांवर काही ठिकाणी होल पाडण्यात आले आहेत
चाकण- पुणे मार्गावर ट्रकला आग
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात
चिंबळी फाट्याच्या अलीकडे, चाकण-पुणे मार्गावर एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी उप अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली
छत्रपती संभाजीनगर -
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी आमदार अंबादास दानवे यांनी बाजवला मतदानाचा हक्क
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी, पदवीधरांचे प्रश्न सक्षमपणे मांडण्यासाठी आणि सुशिक्षित समाजाच्या उज्ज्वल भविष्याकसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.
आपले एक मत, लोकशाहीची ताकद वाढविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोशल मिडियावर टिप्पणी प्रकरणी सांगलीच्या ईश्वरपूर पोलिस ठाण्यामध्ये एका डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कासेगावचे डॉक्टर संजय शेळके यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट मनीषा रोटे यांनी फिर्याद दाखल केली होती.
१५ ऑक्टोबर रोजी खासदार प्राणिती शिंदे यांनी फेसबुकवर भाजपविरोधात पोस्ट केली होती यावर सचिन शेळकेने महिलांच्या विनयभंग करणारे, आपत्तीजनक आणि अश्लील कमेंट केली होती.
याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यामध्ये डॉक्टर सचिन शेळके यांच्याविरोधात काँग्रेस नेत्या ऍडव्हकेट मनीषा रोटे यांनी केलेला तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला
पुणे -
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी १० वाजेपर्यंत ८.८६ टक्के मतदान
शिक्षक मतदारसंघासाठी १२.९४ टक्के मतदान
पुणे विभागात आज दोन्ही मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यांमध्ये मतदान
- कुंभमेळा होत असलेल्या पंचवटीत मद्यविक्रीवर निर्बंध लावण्याची तयारीत
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत
- नाशिकच्या रामकुंड, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तलाव परिसरात मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याबाबत चर्चा
- कुंभमेळ्याचे धार्मिक पावित्र्य, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
- जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडून मागवला अहवाल
संभाजीनगर - मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सकाळच्या सत्रात 6.52 टक्के मतदान
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज सकाळी 8 ते 10 या दोन तासांच्या कालावधीत एकूण 6.52 टक्के मतदान झालं आहे. विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये मिळून 21 हजार 293 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या मतदारसंघात एकूण 3 लाख 26 हजार 700 मतदार असून, त्यापैकी 18 हजार 353 पुरुष, 2 हजार 940 महिला आणि इतर प्रवर्गातील कोणत्याही मतदाराने मतदान केलेलं नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शरद पवारांची भेट घेणार
राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत याबाबत चर्चा होण्याची शक्यता
सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण
ऐन सणासुदीत शेतकऱ्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न
नमो शेतकरी सन्मान योजनेचे थकीत हफ्ते यामुळे देखील शेतकरी अडचणीत
या मुद्द्याला अनुसरून आजच्या बैठकीत सरकारला घेरण्याची रणनीती ठरू शकते
जळगाव महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठिय्या आंदोलन.
अतिक्रमणावरील कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन
छोट्या व्यक्तींबरोबरच शहरातील मोठ्या अतिक्रमणांवर देखील कारवाई करण्याची मनसेची मागणी
दिवाळीचा सण असल्या कारणाने छोट्या आणि गरीब व्यक्तींवर हातगाड्यांवर अतिक्रमणावर कारवाई करू नये
गरीब व्यक्तींवर कारवाई करत असाल तर मोठ्या व्यक्तींच्या अतिक्रमणावर देखील कारवाई करावी अशी मनसेची मागणी
हिंगोली - मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदार यादीत मोठा घोळ
२५००० मतदारांच्या नावात आणि पत्त्यामध्ये गोंधळ
महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप घुगे यांचा गंभीर आरोप
हिंगोलीत मतदान केल्यानंतर दिलीप घुगे यांनी आरोप केले
बीड जिल्ह्यात दुष्काळाची भीषण स्थिती
241 टँकर चा प्रस्ताव मंजूर
टँकरद्वारे गाव खेड्यांची तहान भागवली जाणार
मात्र टँकरद्वारे पिण्यायोग्य पाणी मिळत नाही
अमरावती जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती
७ लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान
राज्य सरकारकडे ७३४ कोटींची मागणी
आज पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी मतदान होत आहे.
मात्र या मतदान प्रक्रियेमध्ये राज्यातील हजारो शिक्षकांची नावच गायब झाल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागलेल्या आहेत.
यापूर्वी अनेक वेळा मतदान करून देखील यंदाच्या लिस्टमधून नावं कशी गायब झाली ? असा सवाल आता शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राध्यापकांकडून होताना दिसत आहे.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूककोंडी
वाहतूककोंडी मध्ये अडकलेले वाहनचालक हैराण
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
सकाळी वर्दळीचा वेळ असल्याने सिंहगड रोड वरील पूल झाला "जॅम
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
पदवीधर व शिक्षक मतदारांना केले आवाहन
राज्यात 5 ठिकाणी शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान
अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज मध्ये उद्यापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 58 वा पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होणार...
30 ऑक्टोबरला देश-विदेशातुन मोझरी गुरुकुंजात येऊन लाखो गुरुदेव भक्त वाहणार तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली..
तर 31 तारखेला गोपालकाल्याने होणार पुण्यतिथी महोत्सवाची सांगता
शहाद्यात गांजाच्या शेतीवर नंदुरबार क्राइम ब्रांचचा छापा
तब्बल 2 कोटी 46 लाखांचा गांजा जप्त
492 किलो ओल्या गांजाची झाडे हस्तगत
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी हिंगोली मध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे,
निवडणूक अधिकारी पोलीस प्रशासन आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या दिग्रस कराळे गावात पहिल्या मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे
अरविंद कृष्णाजी कराळे या पदवीधर मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला आहे
पुण्यात वानवडीमध्ये वकिलावर हल्ला
आरोपींवर कठोर कारवाई करून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याची ॲड. तोसिफ शेख यांची मागणी
* नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात
* सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात
* वर्धा जिल्ह्यातील ४१ मतदान केंद्रांवर मतदान सुरू
* जिल्ह्यात एकूण २१ हजार ४७२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ
पदवीधर साठी ४७ उमेदवार रिंगणात आहे तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार मैदानात
पुणे जिल्ह्यात १६० मतदान केंद्र तर ८८ हजार मतदार
प्रभाग समिती सदस्य निवडीवरून शिंदे सेना-भाजपमध्ये अंतर्गत वाद
शिंदे सेनेचे आमदार मामा लांडे यांना अंतर्गत वादाचा फटका
आमदार मामा लांडे यांचा मुलगा प्रणव लांडे यांचा पराभव
आज दिवे घाटातील वाहतूक दुपारी २ तास राहणार बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवे घाट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू
दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार
राज्यात आज या निवडणुका पार पडणार आहेत
सोलापूर - बोगस मतदार नोंदणी आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार
- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा बोगस मतदारांना इशारा
- मतदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
- सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक तयारी पुर्ण
- जिल्ह्यातील 193 मतदान केंद्रावर साहित्य पोहोचले असून तयारी पुर्ण झालीय.
अंबरनाथमध्ये हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या महिला आरोपीसह अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील सिद्धार्थनगर परिसरात एक महिला आणि एक इसम संशयास्पदरीत्या विक्री करताना आढळले.
पोलिसांनी तपास केला असता, त्यांच्याकडे ४ लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचे २३.०६ ग्रॅम हेरॉईन आणि १ हजार ९३० रुपये रोख रक्कम आढळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.