Sangli Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, प्रवासी जीपची दुचाकीला धडक; आईसह २ मुलांचा मृत्यू

Sangli Bike And Car Accident: सांगलीच्या कवलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. सांगलीच्या कवलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या कवलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या अपघातामध्ये दिपाली विश्वास म्हारगुडे (२८ वर्षे), सार्थक (७ वर्षे) आणि राजकुमार (५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल दादासो म्हारगुडे (३० वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत.

विशाल म्हारगुडे हे मुळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहणारे आहेत. ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते. त्याचेवळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली. जखमी झालेल्या विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे. या अपघाताचा तपास सांगली पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT