Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही येऊ नका', जरांगे पाटील यांचा भुजबळांना इशारा

Maratha Reservation News: 'आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही येऊ नका', जरांगे पाटील यांचा भुजबळांना इशारा

Satish Kengar

>> संजय जाधव

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal:

मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं होत. आता जरांगे यांनीही पलटवार करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''भुजबळ याच वय झालं आहे. त्यामुळे असं होत आहे. पण आम्ही यांना महत्व देणार नाही. तुम्ही पाच वर्षे जेलमध्ये गेला. मग तुम्हाला कोण शेंदूर फासेल. आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही येऊ नका.''

ते म्हणाले की, ''भुजबळ काही म्हणतील, उद्यापासून आम्ही त्यांना महत्व देणार नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. मात्र तसे होणार नाही. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. ओबीसीतच आता आरक्षण हवं आहे.'' मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे हे सध्या राज्यभरात दौरा करत आहेत. यातच आज सांगलीत एका सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''सरकारला आपण वाढवून वेळ दिला आहे. आपण स्वतःहून दिला नाही. आपली चर्चा चार भिंतीच्या आत नसते. सरकार सारखे माझ्यावर प्रयोग करत होते. पण मी पण खानदानी शेतकरी पोरगा आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''सरकारच्या मातब्बरांच्या तीन फळ्या परत पाठविल्या होत्या. जातीसाठी सगळी माहिती दिली. २००४ च्या जीआर मध्ये सुधारणा केली. शिष्टमंडळ आलं, त्याच्यावर सुधारणा केली. त्यात फक्त वंशावळी मराठ्यांना कुणबी समाज प्रमाणपत्र देणार म्हटलं, हे कोणाकडेच नाही.''

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''मराठ्यांच्या पोराचं कल्याण होत असताना आता काही जण एकत्रित यायला लागले आहेत. आम्हला काही घेणं देणं नाही. पण आमहाला आरक्षण हवं आहे. गाफील राहू नका. आपल्या एका चुकीमुळे समाज आणि पोराचं वाटोळं होऊ देऊ नका. मराठ्यांना आरक्षण असताना दिलं नाही. त्यांनी सत्तर वर्ष आपण मागे आहोत. आता लाखोंच्या संख्येने नोंदी सापडल्या आहेत.''

जरांगे म्हणाले, ''२४ डिसेंबरपर्यत गावबंदी आपण काढली. जर मराठा आरक्षण कोणी विरुद्ध करत असेल तर, त्याच्या पाया पडा. आंदोलन करू नका. पण विषही कालवू नको. ज्यांना गरज आहे त्यांना घेऊ द्या आरक्षण.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT