Chhagan Bhujbal: अंबडच्या OBC एल्गार सभेतून छगन भुजबळांचं मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीकास्त्र

OBC Sabha : अंबड येथे ओबीस समाजाची सभा होत आहे. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटलांवर टीकास्त्र सोडलं.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam Tv
Published On

Chhagan Bhujbal OBC Sabha :

मंडल आयोग हा व्ही. पी. सिंग सरकारने मान्य केला. २७ टक्के ओबीसीला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आम्ही मागणी केली, त्यानंतर पवारसाहेबांनी अंमलबजावणी केली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ननवरे यांनी आम्हाला हे आरक्षण मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार दिलं. दुसरे कुणी दिले नाही. मात्र आज एक मराठ्यांचा देव निर्माण झालाय, त्याला साळी-माळी कोळी कळलाच नाही, अशी घणाघाती टीका भुजबळांनी जरांगे-पाटलांचं नाव न घेता केली. (Latest News)

मराठा समाजाला ओबीसमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे सभा होत आहे. या सभेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक झालेले दिसले. मराठा आरक्षणावरून टीकास्त्र सोडताना भुजबळांनी जरांगे- पाटील ते पंतप्रधान मोदींवर सर्वांवर टीका केलीय. कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?" असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायचं आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नसल्याचं भुजबळ म्हणाले. दरम्यान भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत ओबीसी आरक्षण बचाओ या घोषणेला धार दिली. या सभेला हजारो ओबीसी समाजातील लोकांनी हजेरी लावली. हा शेवटचा मेळावा नाही, यापुढे जिल्ह्या-जिल्ह्यात मेळावे घ्या, ही ज्योत प्रत्येक तालुक्यात पेटली पाहिजं, असं जनसभेला संबोधित करताना भुजबळ म्हणालेत.

पोलिसांचं मनोबल कमी झालं

अंतरावली सराटी येथे मराठा आंदोलन चालू असताना पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्यानंतर हे आंदोलन चिघळलं. लाठीचार्ज झाल्यामुळे पोलिसांवर आणि गृहमंत्र्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. त्यावरूनही भुजबळांनी हल्लाबोल केला. या लाठीचार्जवरुन गंभीर आरोप केले.

मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी ७० पोलिसांवर हल्ले झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण महाराष्ट्रासमोर चुकीचं चित्र गेलं. गृहमंत्री माफी मागू लागले, गुन्हे मागे घेऊ म्हणू लागले, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचल्याचं, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

रोहित पवारांवर टीका

ओबीसी एल्गार सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर टीका केली. आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज झाल्यानंतर हे सरदार म्हणजे मनोज जरांगे घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्यांना पहाटे ३ वाजता परत आणून बसवले. शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असं भुजबळ म्हणाले. पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी गावा-गावात लागलेले मराठा आंदोलनाचे बोर्ड काढून टाकावेत,असेही भुजबळ म्हणाले.

गावबंदीवरून हल्लाबोल

मराठा आरक्षणाविषयी सरकारकडून लवकर निर्णय होत नसल्यानं मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली. कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश द्यायचा नाही,अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली. त्यावरूनही भुजबळांनी हल्लाबोल केला. आमदारांना गाव बंदी, खासदार मंत्र्यांना गाव बंदी केली गेली. मग महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहिला आहे का? असा सवाल भुजबळांनी केला.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange On Raj Thackeray: आमचा बोलवता धनी मराठा समाजच; मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com