Indrayani River Viral Video: विषारी फेसानं कोंडतोय इंद्रायणी नदीचा श्वास; प्रकरण थेट PM मोदींपर्यंत पोहचलं, VIDEO

Indrayani River Viral Video: पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
Indrayani River Viral Video
Indrayani River Viral VideoSaam digital
Published On

Indrayani River Viral Video

पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. राज्यभरातून आळंदी या तीर्थक्षेत्रात येणारे लाखो भाविक आणि वारकरी मोठ्या भक्तीभावाने इंद्रायणी नदीचे पाणी पित असतात. मात्र आता इंद्रायणी नदीची दूरावस्था झाली म्हणणे वावगे ठरणार नाही. इंद्रायणी नदी पात्रात केमिकल युक्त पाणी सोडले जात असल्याने आता पाणी पूर्णपणे दुषित झाले आहे. सर्वत्र नदीच्या पाण्यावर केमिकलचा विषयुक्त फेसच फेस दिसत आहे. त्यामुळे नदीला हिम नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indrayani River Viral Video
Viral Video: थरारक स्टंट! चक्क धावत्या बाईकवरून फटाके फोडण्याचं धाडस...तरुणाच्या आलं अंगलट ...VIDEO व्हायरल

इंद्रायणीचे गेले काही वर्ष पावित्र हे धोक्यात आले आहे. आळंदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मते, उद्योगांमधून सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले पाणी, रसायने आणि विषारी कचरा आणि लाँड्रीमधून प्रक्रिया न केलेले पाणी हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. अनेक वर्षापासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे

Indrayani River Viral Video
Mumbai LPG Rate Reduced: खूशखबर! LPG गॅसच्या किमतीत मोठी कपात, मुंबईत काय असेल दर, जाणून घ्या

थेट पंतप्रधान मोदीनां लिहीले पत्र...

'द फ्रि प्रेसच्या जनरलच्या वृ्त्तानूसार' या गंभीर स्थितीमुळे पर्यावरणवादी चिंतेत आहेत. प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले आहे. तसंच यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि नगरविकास विभागाला पत्रेही पाठवली आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत इंद्रायणी तसंच पवना नद्यांचे पावित्र पुन्हा मुळ रुपात येईल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.

Indrayani River Viral Video
Ragi Barfi Recipe : तुम्हालाही मधुमेह आहे ? गोड खाऊ शकत नाही, मग ही नाचणीची बर्फी नक्की करुन पाहा

दरम्यान, नदीतील फेसाची समस्याही तीव्र झाली आहे. याबाबतीत महापालिकेने कारवाई केली नसून प्रदूषण रोखण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र प्रशासन कधी जागे होणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Indrayani River Viral Video
Viral Video : 'टीसीं'च्या डान्सचा VIDEO व्हायरल, यावर नेटकरी संतापले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com