मुंबईची लोकल ट्रेन आणि त्यातील गर्दी मुंबईकरांच्या आयुष्यातला एक भाग बनली आहे. त्यातच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरूणाईमध्ये धावत्या लोकलमध्ये स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसंच यामुळे जिवालाही धोका निर्माण होतो आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कायमच प्रयत्न होत असतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आता टीसींच्या गणवेशातील दोन तरूणांनी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले आहेत. हे दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. टीसीच्या गणवेशात आणखी एका तरूणाने रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्या वेळी तयार केलेला रील्सही व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत रेल्वेचे ओळखपत्र आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून हे तरुण टीसी रील्स बनवत आहेत. संबंधित टीसीच्या (कथित) अकाउंटवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. परंतु रेल्वे प्रशासनास याबद्दल काही माहिती नाही. मात्र हे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आहेत की रील्स बनवणारे तरूण हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकारावर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या तरुणांवर कारवाई होणार का...?
कायद्यानुसार, धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना सेल्फी घेणे तसंच रील्स बनवणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु काही दिवसांपासून टीसीच्या गणवेशात रील्स तयार करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? हा नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.