Viral Video: मैत्री असावी तर अशी! कुत्र्याने वाचवला दुसऱ्या कुत्र्याचा जीव; बिबट्याला थेट पळवूनच लावलं

Leopard Attack Dog Viral Video: तुम्ही माणसाच्या आणि कुत्र्याच्या मैत्रीविषयी अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण कुत्र्याची एका दुसऱ्या कुत्र्याबरोबरची मैत्री पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
Leopard Attack Dog Viral Video
Leopard Attack Dog Viral VideoSaam TV
Published On

Leopard Attack Dog Viral Video

कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी मानला जातो. कुत्र्यासारखा प्रामाणिक मित्र कुठेही भेटणार नाही. आतापर्यंत तुम्ही माणसाच्या आणि कुत्र्याच्या मैत्रीविषयी अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण कुत्र्याची एका दुसऱ्या कुत्र्याबरोबरची मैत्री पाहून तुम्हीही भावूक व्हाल. जुन्नरमध्ये मध्यरात्री एका बिबट्याने अचानक कुत्र्यावर झडप मारली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Leopard Attack Dog Viral Video
Viral Video: धक्कादायक! चोरी करण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल;मेट्रोच्या बाहेर महिलेला घेरलं अन्...; घटनेचा Video व्हायरल

ही बाब दुसऱ्या कुत्र्याच्या लक्षात येताच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी थेट बिबट्यासोबत पंगा घेतला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने बिबट्यावर हल्ला चढवला. दोन्ही कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे अखेर शिकारी बिबट्याला धूम ठोकावी लागली.

हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील प्रदीप दजाधव यांच्या बंद कंपाऊंडमध्ये पाळीव कुत्रा झोपला होता.

रात्रीच्या अंधारात अचानक या कुत्र्यावर एका शिकारी बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली. दोघांनी मिळून बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केला.

दोन्ही कुत्र्यांच्या प्रतिकारापुढे अखेर बिबट्याला हार मानावी लागली. त्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. बिबट्या आणि कुत्र्यांच्या या लढाईचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मानवी वस्तीत होणारे बिबट्याचे हल्ले चिंत्तेचा विषय ठरत असल्याने नागरिक दहशतीखाली आहे.

नाशिक शहरात एकच वेळी घुसले दोन बिबटे

नाशिक -शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत एकाचवेळी गोविंदबाग आणि सिडको परिसरात दोन बिबटे शिरल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाने सिडको परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद केलं आहे. तर गोविंदनगरमध्ये शिरलेल्या बिबट्याचा शोध सुरू आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com