Buldhana News : अवैध रेती उत्खनना विरोधात खडकपूर्णा पात्रात आंदोलन: शिवसेनेचे तालुका प्रमुखांचे ८ दिवसांपासून उपोषण

Buldhana News : अवैध रेती उत्खनना विरोधात खडकपूर्णा पात्रात आंदोलन: शिवसेनेचे तालुका प्रमुखांचे ८ दिवसांपासून उपोषण
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

संजय जाधव 
बुलढाणा
: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात आहे. यामुळे (Buldhana) शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. या विरोधात आंदोलन उभारले असून शिंदे गटाच्या शिवसेना (Shivsena) तालुका प्रमुखांनी खडकपूर्णा नदीपात्रात उपोषण सुरु केले आहे. (Breaking Marathi News)

Buldhana News
Kalyan Crime News: कल्याणमध्ये तरुणाची हत्या; चार्जरच्या वायरने आवळला गळा

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात अवैध रेती उत्खनन सुरु आहे. यास कारणीभूत असणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि खनीकर्म अधिकारी, तहसीलदार यांच्यावर अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई (Khadakpurna) प्रस्तावित केली आहे. मात्र या अधिकाऱ्यांवर अद्याप कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. शिवाय स्थानिक तहसीलदार देखील अवैध रेती उत्खननाला अभय देत असल्याचा आरोप करत शिंदे यांच्या शिवसेना तालुकाध्यक्ष अनिल चित्ते आपल्या सहकार्यासह खडकपूर्णाच्या पात्रात उपोषणाला बसले आहेत. 

Buldhana News
Nandurbar News: पाऊस नसल्याने ३ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती; नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांपुढे संकट

८ दिवसांपासून उपोषण 

अनिल चित्ते हे मागील ८ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ८ दिवस उलटून देखील त्यांच्या या उपोषण मंडपाला अधिकाऱ्यांनी साधी भेट देखील दिली नाही.  त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यात प्रशासनाविरोधात रोष पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com