Soldier Death  Saam tv
महाराष्ट्र

Soldier Death : सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत सांगलीच्या जवानाला वीरमरण; बिहारमध्ये प्रशिक्षणादरम्यान घडली घटना

Sangli News : अवघ्या २६ व्या वर्षी अथर्व यांची लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. विशेष म्हणजे अथर्वने आयटी कंपनीतील नोकरी सोडून सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला

विजय पाटील

सांगली : भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत असलेल्या सांगली जिल्ह्यातील तरुणाला बिहारच्या गया येथे वीरमरण आले आहे. गया येथे प्रशिक्षण सुरु असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लेफ्टनंट यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणत त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ अंत्यदर्शनासाठी आले होते. 

सांगली जिल्ह्यातील पलूस या गावातील अथर्व संभाजी कुंभार (वय २६) असे या लेफ्टनंट तरुणाचे नाव आहे. अवघ्या २६ व्या वर्षी अथर्व यांची लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. विशेष म्हणजे अथर्वने आयटी कंपनीतील नोकरी सोडून सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अथर्वचे बिहार इथल्या गया मध्ये प्रशिक्षण सुरू होता. यावेळी त्याचे आकस्मिक निधन झाले. 

२० किमीचा टप्पा पार केल्यानंतर अचानक मृत्यू 

दरम्यान बिहार राज्यातील गया येथे अथर्व यांचे प्रशिक्षण सुरु होते. या प्रशिक्षणावेळी त्यांनी २० किलोमीटर अंतरचा टप्पा पार केला. यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता. यानंतर काही वेळातच अथर्व यांचा मृत्यू झाला आहे. अथर्व यांना त्रास जाणवू लागल्याने सोबत असलेल्या जवानांनी त्यांना सैन्य दलाच्या रुग्णालायात नेले. मात्र तोपर्यटन त्यांचा मृत्यू झाला होता.  

गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

या घटनेने कुंभार कुटुंबासह पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अथर्व यांचा पार्थिव पलूस या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. पार्थिव गावी आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याठिकाणी शासकीय इतमामात अथर्वच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिवादन करण्यासाठी पलूसकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT