Mokhada News : हुतात्मा स्मारकाच्या निधीचा गैरवापर; स्मारकाच्या जागेवर अतिक्रमण करत बांधले व्यापारी गाळे

Palghar News : स्मारकाच्या परिसरात बागबगीचा, लहान मुलांसाठीची खेळणी असे अनेक विकास कामे व्हावीत. सौंदर्यात भर पडावी. म्हणून शासनाने ८० लाखांचा निधी मंजूर केला होता
Mokhada News
Mokhada NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
मोखाडा (पालघर)
: ब्रिटिशांपेक्षाही खराब नीतिमत्तेचा वापरून करत हुतात्मा स्मारकाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करत हुतात्मा गणपत खरोटे स्मारकाच्या जागेवर व्यापारी गाळ्यांचा बांधकाम सुरू केले आहे. महत्वाचे म्हणजे जो निधी स्मारकाच्या विकासासाठी वापरला पाहिजे, त्या निधीचा वापर गाळ्यांच्या ईमारतीसाठी वापरण्याचा प्रताप पंचायत समिती मोखाड्यातील अधिकारी यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील हुतात्मा गणपत सखाराम खरोटे स्वतंत्र्याच्या लढ्यात सहभागी होत १९४३ ला आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांची आठवण म्हणुन स्वतंत्र नंतर शासनाने हुतात्मांची स्मारके महाराष्ट्रात व्हावी; म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी १९८४ मध्ये ज्या हुतात्मांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला असे हुतात्मांची स्मारके तालुक्याच्या ठिकाणी व्हावे असे आदेश दिले होते. त्यावेळी मोखाड्यात हे स्मारक उभारले होते.

Mokhada News
Zp School : धक्कादायक! गणवेश वाटपात शिक्षकाची कमिशन मागणी; ऑडिओ क्लिप व्हायरल

स्मारकासाठी ८० लाख रुपयांचा निधी 
यानंतर स्मारकाचे अच्छे दिन यावे. स्मारकाच्या परिसरात बागबगीचा, लहान मुलांसाठीची खेळणी असे अनेक विकास कामे व्हावीत. सौंदर्यात भर पडावी. म्हणून शासनाने ८० लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र बांधकाम विभागाने चक्क हा निधी स्मारकासाठी न वापरता अन्य कामासाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे येथील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.

Mokhada News
Bhandara : खराब रस्त्यावरील चिखलात अडकली रुग्णवाहिका; गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट

व्यापारी गाळे उभारणी 

दरम्यान स्मारक असलेल्या जागेवर अतिक्रमण करत व्यापारी गाळे बांधण्यास खर्च करण्यास सुरुवात केली आहे. हे गाळ्यांचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी; माजी आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे. यामुळे भविष्यात मोखाडा तालुक्यात मोठे आंदोलन होण्याचे नाकारता येत नाही. म्हणून वरिष्ठ पातळीवर याची दखल घेत हा बांधकाम तोडने योग्य राहील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com