sangli, Sangli Crime News, Miraj Police. Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : सांगली पोलीस मुख्यालयातील चंदनाची झाडे चोरणारे दाेघे अटकेत

मुख्यालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीस गेल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) पोलीस मुख्यालयातील ट्राफिक गार्डन मधून चंदनाची झाडे कापून नेल्याप्रकरणी पाेलीसांनी दाेघांना अटक (arrest) केली आहे. अभिमन्यू आनंद चंदनवाले आणि रमेश भीमराव चंदनवाले अशी अटक केलेल्यांची नावे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या (lcb) पथकाने दिली. (sangli latest marathi news)

सांगली येथील वाणलेसवाडी येथे दोघेजण चंदन विक्रीसाठी आले असताना ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाच्या आवारातील गार्डनमध्ये (ता. 15 जुलैला) पहाटेच्या सुमारास दोघांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचारी दीपक वडेर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

मुख्यालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीस गेल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (dixit gedam) यांनी गुन्हे अन्वेषणसह विश्रामबाग पोलिसांना तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण या चोरट्यांच्या मागावर होते. वाणलेसवाडी येथे चंदनाची तुकडे विक्री करण्यासाठी दोघेजण आल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तात्काळ तेथे जाऊन संशयास्पद फिरणा-या दाेघांना ताब्यात घेतले..

या दाेघांकडून चार हजार किमतीचे तीन किलो 138 ग्रॅम वजनाचे चंदनाचे तुकडे मिळाले. दोघांची चौकशी केली असता पोलीस मुख्यालयाच्या आवारातून चंदनाची झाडे तोडून विक्री केल्याचे कबुली त्यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT