NCP Ajit Pawar faction candidate in Jat :  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Local body Election : निवडणुकीला हिंसक वळण; अजितदादांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक, भाजपवर गंभीर आरोप

stone pelting during Sangli Jat municipal election campaign :जत नगरपरिषद निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

violent attack on NCP Ajit Pawar faction candidate in Jat : नगरपरिषद आणि नगरपंचायतच निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काही तासांत प्रचाराच्या तोफा थंडावतील, पण त्याआधी या निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे.सांगलीमधील जतमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. काही अज्ञांत व्यक्तींनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावराच्या घरावर आणि गाडीवर दगड फेकून मारले. या घटनेत अद्याप कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.पण गाडी आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू झाला आहे.

सांगलीमधील जत नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पण त्याआधी जतमध्ये प्रचाराला हिंसक वळण लागेय. जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे काही अज्ञांत व्यक्तींकडून सुरेश शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काही लोंकांनी शिंदेंच्या दगडफेक करत शिंदेंच्या कारच्या काचाही फोडल्या. सुरेश शिंदेंकडून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करण्यात येत आहे. माजी आमदार विलासराव जगतापांनी या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप केला. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे.

आज रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता होणार आहे. त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे २ डिसेंबर २०२५ रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्या येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निर्घृण हत्या अन् खांबाला बांधलं; तरूणासोबत मध्यरात्री नेमकं काय घडलं? कोल्हापूर हादरलं

Anti Aging Diet: टवटवीत, मऊ आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी कोणता आहार घ्यावा?

Bigg Boss 19 : बाई काय हा प्रकार! तान्या मित्तलनं बिग बॉसमधील 'या' सदस्यावर केली काळी जादू? VIDEO होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Live News Update: शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली हे मी कधीही विसरू शकत नाही- अजित पवार

Team India: विराट-रोहितला मिळणार 'फुल इज्जत', गंभीर-आगरकरचा BCCI घेणार क्लास, बोलवली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT