Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : नर्सरीमध्ये अग्नितांडव, नवरा वाचला, बायकोचा संशायस्पद मृत्यू, सांगलीमध्ये खळबळ

Sangli News : सांगली शहरातील मयूर नर्सरीला लागलेल्या भीषण आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी व पती फरार असल्याने घातपाताचा संशय, विश्रामबाग पोलिसांचा तपास सुरू.

Alisha Khedekar

  • सांगलीतील मयूर नर्सरीला भीषण आग लागून महिलेचा मृत्यू

  • पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी असल्याचे निदर्शनास

  • घटनेनंतर महिलेचा पती फरार, संशय अधिक गडद

  • विश्रामबाग पोलिसांकडून आग व मृत्यू प्रकरणाचा कसून तपास

विजय पाटील, सांगली

सांगली मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली शहरातील धामणी चौक येथे असणाऱ्या मयूर नर्सरीला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या भीषण आगीत नर्सरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता मनगुळे-लोंढे व तिचा पती कर्नाटकातील कागवाड येथील असून ते सध्या सांगली शहरातील धामणी चौकातील मयूर नर्सरीमध्ये राहण्यास होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नर्सरीमध्ये असणाऱ्या पत्राच्या शेडला व नर्सरी मधील झाडांना आग लागली. आगीची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

अग्निशमन घटनस्थळी पोहचेपर्यंत महिला ज्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती त्या ठिकाणी ती होरपळली. शिवाय त्या पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी असल्याचे निदर्शनास आले. तसेच आगीच्या घटनेनंतर तिच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आगीत होरपळून मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीचा शोध रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसांकडून घेतला जात होता. दरम्यान निकिता मनगुळे-लोंढे हिचा आगीत होरपळून मृत्यू झाला की तिचा पतीने घातपात केला. याबाबत ही विश्रामबाग पोलीस कडून तपास केला जातो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Calculation: तुमचा पगार ₹५०,००० आहे? रिटायरमेंटनंतर मिळतील ५.५ कोटी, कसं? कॅल्क्युलेशन वाचा

Kande Poha Recipe: घरच्या घरी मऊ आणि मोकळे कांदा पोहे कसे बनवायचे? सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

Amitabh Bachchan: 'एक-एक करून सगळे...'; अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

Silent Heart Attack Warning: सायलेंट हार्ट अटॅक ओळखा! झटका येण्यापूर्वी शरीरात होऊ लागतात हे बदल

SCROLL FOR NEXT