Sangli Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: सांगली हादरली! मस्करी जिव्हारी लागली, तरुणाने भावाला जीवानिशी संपवलं; VIDEO व्हायरल

Youth Killed By Cousin: सांगलीमध्ये एका तरुणाने दारूच्या नशेत चुलत भावाची हत्या केली. चेष्टा मस्करी सहन न झाल्याने त्याने भावाचा जीव घेतला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary:

  • सांगलीत तरुणाकडून चुलत भावाची हत्या

  • दारूच्या नशेत झालेली हाणामारी जीवघेणी ठरली

  • जत तालुक्यातील खून प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल

  • उमदी पोलिसांचा हत्या प्रकरणाचा तपास सुरू

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये तरुणाने आपल्या चुलत भावाची हत्या केली. दारूच्या नशेत असताना चेष्टा-मस्करीत दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणानंतर फ्री स्टाईल हाणामारीत तरुणाने चुलत भावाला जागीच संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले व्हिडीओ बनवत होते आणि हसत होते. पण कुणीच त्या तरुणाचा जीव वाचवला नाही. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या जत तालुक्यातल्या भिवर्गी येथे ही घटना घडली. तरुणाने चुलत भावाला मस्करी केल्याच्या रागातून जीवानिशी संपवलं. दोघेही दारूच्या नशेत होते. त्यावेळी मस्करीमधून दोन्ही भावांच्यामध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. ज्यामध्ये नशेत असणाऱ्या तरुणाने चुलत भावाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने चुलत भावाचा गळा दाबला. या घटनेत त्याच्या चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमध्ये महादेव बिरादार (२६ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. कहर म्हणजे दारूच्या नशेत सुरू असलेल्या मारामारीचा व्हिडिओ देखील तिथे असणाऱ्या काही जणांकडून चित्रित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही भावांची हाणामारी सुरू असताना देखील कुणीच मध्ये येऊन त्यांना थांबवले नाही. भिवर्गी येथील गौडर वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली असून भावाच्या खून प्रकरणी चुलत भाऊ सालसिद्ध बिरादारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उमदी पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT