Police Raid Lodge at Midnight Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: मध्यरात्री लॉजवर पोलिसांची धाड, २ महिलांना पुरूषांसोबत नको त्या अवस्थेत पकडलं

Police Raid Lodge at Midnight: सांगलीमध्ये पोलिसांनी लॉजवर धाड टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी २ महिलांची सुटका केली.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. सांगली शहरातील एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आणखी २ संशयित सध्या फरार आहेत. या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या कारवाईनंतर सांगलीत खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील आर्या लॉजमध्ये देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ‘फ्रीडम फर्म’ या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणाची पडताळणी सुरू केली. पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खात्री केली आणि त्यानंतर लॉजवर छापा टाकला.

पोलिसांनी लॉजवर छापा टाकताच एकच गोंधळ उडाला. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांना नको त्या अवस्थेत पकडले. या दोन महिलांना जबरदस्ती या व्यवसायात आणले होते. पोलिसांनी या दोन्ही महिलांची सुटका केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नितीन मनोहर चौगुले, (वय ३५, रा. नागाव, ता. वाळवा) हा महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती समोर आली.

या देहविक्री रॅकेट प्रकरणात मुंबईतील चेंबूर येथे राहणाऱ्या गणेश तुपे आणि प्रवीण शिंदे या दोघांचीही नावं समोर आली असून ते सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Refrigerator electricity consumption: फ्रीजचा दरवाजा वारंवार उघडल्याने वीजबिल वाढतं का?

Maharashtra News Live Update: अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

कोकणात राजकीय राडा! ठाकरेंच्या बड्या नेत्याला राहत्या घरातून अटक; आमदार राणेंवर केलेली आक्षेपार्ह टिप्पणी

माहूर घाटात टेम्पो दरीत कोसळला, ३ भाविकांचा मृत्यू, ५ गंभीर; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला

Brown Egg Vs White Egg: तपकिरी की सफेद, कोणती अंडी आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक?

SCROLL FOR NEXT