Nepal Tourism : भाततातून नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक की आधार कार्ड ? नेपाळ प्रवासाचे नियम जाणून घ्या

India to Nepal travel rules : भारतातून नेपाळला जाण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसा लागत नाही, मात्र प्रवासासाठी योग्य ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. नेपाळ प्रवासाचे संपूर्ण नियम जाणून घ्या.
Travelling from India to Nepal Complete Document Checklist
Travelling from India to Nepal Complete Document Checklistsaam tv
Published On: 

भारतातून नेपाळला जाण्याचा विचार करत असाल, तर प्रवासापूर्वी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात खुली सीमा असल्याने भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते.

मात्र, याचा अर्थ कोणत्याही ओळखपत्राशिवाय नेपाळमध्ये प्रवेश करता येतो, असा नाही. विशेषतः आता अयोध्या ते नेपाळमधील जनकपूरदरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या मनात पासपोर्ट, आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Travelling from India to Nepal Complete Document Checklist
Cyber Safety : तुमचा नंबर कंपन्यांकडे कसा पोहोचतो? जाणून घ्या स्पॅम कॉलमागची ५ कारणे

नेपाळला जाण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नसली, तरी वैध ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. प्रौढ भारतीय नागरिकांसाठी भारतीय पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाने जारी केलेले मूळ फोटो असलेले मतदार ओळखपत्र (वोटर आयडी) हे सुरक्षित पर्याय आहेत. भारतीय दूतावासाने जारी केलेले वैध प्रवास प्रमाणपत्रही काही विशिष्ट परिस्थितींमध्ये ग्राह्य धरले जाऊ शकते.

केवळ आधार कार्डवर अवलंबून राहू नका

नेपाळ प्रवासासाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, केवळ आधार कार्डच्या भरवशावर नेपाळला जाण्याचे नियोजन करणे टाळावे. विशेषतः विमानप्रवासासाठी आधार कार्ड वैध प्रवास दस्तऐवज मानले जात नाही. मोबाईलमध्ये असलेला ओळखपत्राचा फोटो, स्क्रीनशॉट किंवा स्कॅन कॉपी ही मूळ कागदपत्रांचा पर्याय ठरत नाही. त्यामुळे प्रवास करताना मूळ आणि वैध ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.

Travelling from India to Nepal Complete Document Checklist
Health Tips : सतत तहान, थकवा अन् अचानक वजन कमी होतेय? ही लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नका

विमानाने प्रवास करतानाही नियम लागू

नेपाळला विमानाने जाताना व्हिसाची आवश्यकता नसली, तरी विमानतळावर ओळखपत्रांची तपासणी केली जाते. त्यामुळे पासपोर्ट किंवा आवश्यक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गाने प्रवास करतानाही सीमा ओलांडताना कागदपत्रांची तपासणी होऊ शकते.

प्रवासापूर्वी ही काळजी घ्या

नेपाळला जाण्यापूर्वी आपल्या ओळखपत्राची वैधता तपासा. केवळ आधार कार्ड किंवा डिजिटल ओळखपत्रावर अवलंबून राहू नका. तसेच रेल्वेने प्रवास करणार असल्यास तिकीट आणि ओळखपत्रावरील माहिती अचूक असल्याची खात्री करा. नेपाळला जाण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसाची आवश्यकता नसली, तरी वैध ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. त्यामुळे पासपोर्ट किंवा मूळ मतदार ओळखपत्र सोबत ठेवूनच नेपाळच्या प्रवासाचे नियोजन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.