रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

Pune Bengaluru Highway influencer reel stunt traffic jam: रिल्ससाठी एका इनफ्ल्युएंसरनं रस्त्यावरील हजारो गाड्यांना अडवल्यानं ट्राफिक जाम झालाय... मात्र रिलबाजांनी हा धुमाकूळ नेमका कुठे आणि कसा घातलाय?... पाहूयात या रिपोर्टमधून...
Pune Traffic Jam: Reel Star’s Stunt Blocks Thousands Of Vehicles On Highway
Pune Traffic Jam: Reel Star’s Stunt Blocks Thousands Of Vehicles On Highwaysaam tv
Published On

खराब रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि तासनतास लागणाऱ्या ट्राफिक जामने पुणेकर आधीच त्रस्तयेत. पण आता पुणेकरांच्या याच त्रासात भर पडली ती रिल्सची. होय रिल्सच्या नादात पुण्यात आता ट्रॅफिकजाम व्हायला लागलंय.

हा व्हिडिओ जरा नीट पाहा... पुणे-बंगळुरू महामार्गावर फुलांचा हार घातलेली नवी कोरी आलिशान काळी गाडी रस्त्याच्या मधोमध अतिशय संथ गतीनं चालते.. त्यामागे ट्रकवर एक कोरी गाडी झाकून घेऊन जाण्यात आली. या गाड्यांच्या आजू बाजूला ६ काळ्या गाड्या तितक्याच संथ गतीनं धावतायेत. आणि हा सगळा ताफा आपल्या ड्रोन कॅमेऱ्यातून शूट करण्यासाठी हा सगळा कारनामा सुरू होता. मागे अगदी काही किलोमीटरपर्यंत संपूर्ण महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या... मात्र त्याचं रिलबाजांना काही सोयरसुतक नव्हतनं. या रिलच्या नादात हजारो पुणेकरांना नाहक वेठीस धरले गेले. आपल्या बापाचा हायवे समजून मनमानी करणाऱ्यां या रिलस्टार्सचा पोलिसांनी शोधत सुरू केलाय.

याआधी देखिल अनेकांनी रिल्सच्या नादात अनेक रिल्सस्टार्सनं आपला जीव गमावल्याचं आपण पाहिलंय. तरीदेखिल यांची मस्ती कमी होत नाही. याबाबत काही आकडेवारी पाहूयात...जगभरात सोशल मीडियासाठी सेल्फी किंवा रिल्स काढताना झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 40% ते 46% मृत्यू एकट्या भारतात

मार्च 2014 ते मे 2025 दरम्यान भारतात रील्स आणि सेल्फीच्या नादात स्टंट करताना 214 हून अधिक लोकांचा मृत्यू

मार्च 2014 ते मे 2025 दरम्यान भारतात रील्स आणि सेल्फीच्या नादात स्टंट करताना 57 जण गंभीर जखमी झाले

जगभरात सोशल मीडियासाठी सेलफी व रील्स काढताना शेकडो लोकांचे मृत्यू झाले, एकूण मृत्यूंपैकी ४०% ते ४६% मृत्यू हे आपल्या एकट्या भारतात झाले आहेत. एका व्यापक अभ्यासानुसार, मार्च २०१४ ते मे २०२५ दरम्यान भारतात रील्स/सेलफीच्या नादात स्टंट करताना २१४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर ५७ जण गंभीर जखमी झाले. जागतिक आकडेवारीनुसार या मृत्यूमध्ये भारत प्रथम स्थानावर असल्याचं दुर्दैवी वास्तव समोर आलंय.

ही आकडेवारी नक्कीच विचार करायला लावणारी आहेत. मात्र केवळ लाईक्स आणि कंमेंट्सच्या नादात अल्पावधीत फेमस होण्यासाठी हे चिल्लर चाळे करण्यात अनेक जण आघाडीवर आहेत. आपल्या संपत्तीच ओंगळवाणं प्रदर्शन करणं असो किंवा गाड्या घेऊन असे रिल्स बनवणं असो. हे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता या कथित रिल्सस्टार्सची मस्ती उतरवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com