Sangli Crime news Married Women Shocking Act of Husband Brother in Tasgaon Indiranagar Area Saam TV
महाराष्ट्र

Sangli Crime News: घरातील वस्तू चोरी गेल्याचा राग, वहिनीने केली लहान दिराची हत्या; भयानक घटनेनं सांगली हादरली

Sangli News: घरातील एक वस्तू घेऊन गेल्याचा राग मनात धरून वहिनी आणि पुतण्याने मिळून दीराची चाकूने भोसकून करत हत्या केली.

विजय पाटील

Sangli Crime News: सांगलीच्या तासगाव शहरातील इंदिरानगर परिसरातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. घरातील एक वस्तू घेऊन गेल्याचा राग मनात धरून वहिनी आणि पुतण्याने मिळून दीराची चाकूने भोसकून करत हत्या केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सूरज उर्फ लल्या दिनकर शिंदे (वय २० वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संशयित आरोपी जानकी शिंदे आणि तिचा मुलगा गोपाळ शिंदे यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव शहरातील इंदिरानगर परिसरात (Sangli News) राहणाऱ्या जानकी शिंदे यांच्या घरातून एक वस्तू चोरीला गेली होती. ही वस्तू दीर सूरज यानेच चोरली असावी, असा संशय जानकीला होता. यावरून शुक्रवारी (१ जून) जानकी आणि मृत सूरज यांच्यात वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला (Crime News) गेला, की जानकी आणि तिचा मुलगा गोपाळने सूरज याच्यावर चाकूने वार केले. या घटनेत सूरजच्या गळ्याजवळ, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या खांद्याजवळ गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत सूरजचा मृतदेह ताब्यात घेऊन जानकी दिपक शिंदे आणि तिचा मुलगा गोपाळ दिपक शिंदे या दोघांना अटक केली आहे. तर जतीन आणि अजय जाधव हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : ३१ कोटी ८४ लाखाचा एमडी ड्रग्स जप्त; भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई, दोघेजण ताब्यात

'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही', बड्या नेत्याच्या २६ वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं

MLA Parinay Fuke : पावसाळ्यातील बेडकांशी जरांगे पाटील यांची तुलना, भाजप आमदारांच्या वक्तव्याने वाद पेटणार

Maharashtra Politics : ठाकरे गटानंतर बविआला मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Madhavi Nimkar: माधवी निमकरचा मराठमोळा साज; मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT