Pune News: मावस बहिणीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या; आंबेगाव तालुक्यातील घटना

Two Sisters Drowned In Ghod River: पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला आहे.
Ambegaon Taluka Shocking Incident
Ambegaon Taluka Shocking IncidentSaam TV
Published On

Ambegaon News: पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला आहे. गुरूवारी (३१ मे) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आरती शाम खंडागळे (वय १८) आणि प्रीती श्याम खंडागळे (वय १७) असं मृत्युमुखी पडलेल्या बहिणींची नावे आहेत. (Latest Marathi News)

Ambegaon Taluka Shocking Incident
Mumbai Crime News : ऑनलाईन ट्रेम्पो बूक करुन आईस्क्रीमने भरलेल्या फ्रिजची चोरी, मुंबईतील अजब चोरीचा प्रकार CCTVमध्ये कैद

याबाबत सविस्तर माहिती अशी, की आरती आणि प्रीती या दोघी सख्ख्या बहिणी त्यांच्या मावस भावाच्या वाढदिवसासाठी १० दिवसांपूर्वी मुंबई बांद्रा येथून पुण्यातल्या (Pune News) आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे आल्या होत्या. बुधवारी त्यांच्या घरी मावस भावाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.

मात्र, या आनंदावर काही क्षणातच विरजन पडलं. गुरूवारी दुपारच्या सुमारास घोडनदीच्या काठावर आरती, प्रीती यांच्यासमवेत तिची मावस बहिण कावेरी आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे गेल्या होत्या.  (Breaking Marathi News)

दरम्यान, कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती व प्रीती पाण्यात उतरल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र पाय घसरून पडलेली कावेरी हिचा जीव वाचला.

Ambegaon Taluka Shocking Incident
Mumbai Crime News: प्रेमासाठी धर्म बदलला, लग्नाला नकार दिल्यानं तरूण संतापला; तरुणीवर प्राणघातक हल्ला

आरती बांद्रा (Mumbai) येथे महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात व प्रीती इयत्ता बारावीत शिकत होती. दोन सख्खा बहिणींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुखाचे सावट पसरले आहे.

दरम्यान मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुदाम घोडे तसेच मंचर पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस कर्मचारी सोमनाथ गवारी,धनेश मांदळे, गणेश येळवंडे,अभिषेक कवडे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com