Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime : मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; जतच्या नामांकित आश्रमशाळेतील प्रकार, मुख्याध्यापकाला अटक

Sangli News : आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर घडल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण देखील केली

विजय पाटील

सांगली : मुलींच्या छेडखानीचे प्रकार सुरूच असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच सांगलीच्या जत येथील आश्रम शाळेतील मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर प्रकाराने खळबळ उडाली असून मुख्याध्यापकास ताब्यात घेण्यात आले आहे. 

सांगली जिल्ह्यातील जतमधील सनमडी येथील असणाऱ्या नामांकित आश्रम शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. विनोद जगधने असे या अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. दरम्यान १८ एप्रिलला सन्मडी मधल्या आश्रम शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या विरोध जगधने याने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता, तसेच संबंधित मुख्याध्यापकाकडून पीडित अल्पवयीन मुलीला सदर प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

पालकांकडून मुख्याध्यापकास मारहाण 

दरम्यान आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर घडल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रम शाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण देखील केली होती. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. मात्र नामांकित आश्रम शाळा असल्याने सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 

मुख्याध्यापकास अटक 

मात्र काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली. अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक विनोद जगधने याला अटक देखील करण्यात आली आहे. नरदन मुख्याध्यापकाकडून आणखी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला असून याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांच्याकडून करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT