Solapur Bajar Samiti Election : बाजार समिती निवडणूकीतील दोन उमेदवारात राडा; सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर झाला वाद

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज निवडणूक होत आहे. ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे
Solapur Bajar Samiti Election
Solapur Bajar Samiti ElectionSaam tv
Published On

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान आज होत असल्याने मतदान प्रक्रियेदरम्यान रिंगणात असलेले दोन उमेदवार आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन राडा झाला. निंबर्गी मतदार केंद्रावर हा प्रकार घडला असून पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.  

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. दरम्यान निवडणूकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Solapur Bajar Samiti Election
Akola Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोन गट आले समोरासमोर, दगडफेकीनंतर तणाव

मतदानावरून दोन उमेदवारांमध्ये वाद 

निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पाच ते सहा कर्मचारी असणार आहेत. दरम्यान निंबर्गी येथील मतदान केंद्रावर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन माजी संचालकांमध्ये वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले. यात सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानाच्या करणावरून वाद निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी लागलीच मध्यस्थी करत वाद मिटविला. 

Solapur Bajar Samiti Election
Miraj News : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाजण मुद्देमालासह ताब्यात 

उद्या दुपारपर्यंत निकाल 

सोलापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशाला येथे सात मतदान केंद्रे असून, सर्वाधिक मतदार याच मतदान केंद्रात मतदान करणार आहेत. तर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या श्री सिद्धेश्वर सहकारी कारखाना परिसरातील आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक मंगल कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com