Miraj News : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाजण मुद्देमालासह ताब्यात 

Sangli News : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतो. रिक्षा, गाड्यांमध्ये गॅस सिलेंडरमधील गॅस टाकून वापरला जात असतो. मुळात असे करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे
Miraj News
Miraj NewsSaam tv
Published On

सांगली : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर केला जात असतो. प्रामुख्याने गाड्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत भराला जात असतो. अशा प्रकारे मिरज शहरातील मालगाव रस्त्यावरील खोतनगर येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून पाच सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार व पाईप या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतो. रिक्षा, गाड्यांमध्ये गॅस सिलेंडरमधील गॅस टाकून वापरला जात असतो. मुळात असे करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील चोरून हा गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सांगलीच्या मिरज येथे गॅस रिफिलिंग करण्यासाठी पत्री शेड टाकून अवैध व्यवसाय चालविला जात होता. दरम्यान पोलिस अधीक्षक संदीप घुगे व अपर अधीक्षक रितू खोखर यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला बेकायदा गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर छापे मारण्याचे आदेश दिले आहेत. 

Miraj News
Ambarnath Palika : वन विभागाकडून अंबरनाथ पालिकेविरोधात गुन्हा दाखल; वनविभागाच्या जागेतुन केला अनधिकृत रस्ता

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकला छापा 

त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे एक पथक कारवाईसाठी सज्ज केले होते. पथकातील कर्मचारी यांना माहिती प्राप्त झाली की अभिजित लोहार हा मिरजेतील खोत मळ्यातील घराबाहेर उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा साठा व गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने लोहार याच्या घरावर छापा मारला. 

Miraj News
Akola Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोन गट आले समोरासमोर, दगडफेकीनंतर तणाव

मुद्देमालासह एकजण ताब्यात 

याठिकाणी झडती घेतल्यानंतर शेडमध्ये पाच गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, रेग्युलेटर व रोख १२०० रूपये असा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे गॅस सिलिंडर बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस कर्मचारी अनंत कुडाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com